अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही अशुतोषचे आभार मानताना दिसत आहे.
![अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update Arundhati return in show Everyone was happy अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/a1369645316eba1058bd6d07174340971686217689886259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधती परदेशी गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. अरुंधती गेल्यानंतर मालिकेतील घडामोडींना मालिकाप्रेमी कंटाळलेले होते. आता अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाल्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही अशुतोषचे आभार मानताना दिसत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये दिसत आहे की अरुंधती ही अशुतोषला म्हणते, 'अशुतोष तुम्ही नसता तर यशचं काय झालं असतं?' त्यानंतर अशुतोष म्हणतो, 'असा विचार करु नकोस'. त्यानंतर अरुंधती ही भावूक होते आणि अशुतोष हा तिला शांत करतो. अरुंधती ही परदेशातून परत अल्यानं देशमुख कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या गेल्या एपिसोड दिसले की, अरुंधतीची एन्ट्री झाल्यानंतर अशुतोषचा गगनात मावेनासा होतो आणि तो सर्वांसमोर तिला मिठी मारतो.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.आजही या मालिकेची चांगलीच क्रेझ आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी काही दिवसांसाठी 'आई कुठे काय करते' या मालिकेमधून ब्रेक घेतला होता. मधुराणी प्रभुलकर या काही दिवसांपूर्वी सिडनीला गेल्या होत्या. या फॉरेन ट्रीपचे फोटो मधुराणी या सोशल मीडियावर शेअर करत होत्या. मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. मधुराणी या त्यांच्या मुलीसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)