(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळानं स्वराजला लावणी शिकवली; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये विविध ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही स्वराज ऊर्फ स्वराची आई आणि मल्हारची पहिली पत्नी वैदेहीसारखी दिसते. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही स्वराजला लावणी शिकवताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
14 Years Of Pavitra Rishta: 'पवित्र रिश्ता' मालिकेला झाली 14 वर्ष; अंकिता लोखंडेची खास पोस्ट, सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
14 Years Of Pavitra Rishta: छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) मानव ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) अर्चना ही भूमिका साकारली. या मालिकेला 14 वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये अंकितानं सुशांतचा उल्लेख केला नाही, त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anupamaa Upcoming Twist: अनुपमा मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; काव्यानं गुडन्यूज दिल्यानंतर वनराज कशी देणार रिअॅक्शन?
Anupamaa upcoming twist: अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या (Rupali Ganguly) 'अनुपमा' (Anupamaa) या लोकप्रिय शोमध्ये अनुज आणि अनुपमाच्या ब्रेकअपला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अनुपमा आणि अनुज यांनी त्यांच्या नात्याबाबत निर्णय घेतला आहे. दोघांनी सर्व गैरसमज त्यांनी दूर केले आहेत. अनुज आणि अनुपमा यांनी निर्णय घेतला आहे की, ते कधीही घटस्फोट घेणार नाहीत. परंतु ते सध्या एकत्र राहू शकत नाहीत. माया ही सध्या अनुजला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनुजला अनुपमाला घटस्फोट देण्यास सांगते.हे ऐकून अनुज आणि अनुपमा दोघांना मायाचा खूप राग येतो. अनुपमा या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये अनुज आणि अनुपमा यांच्या नात्यात आणखी कोणते ट्वीस्ट आणि टर्न्स येतात? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल
Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये राज ठाकरे हे त्यांच्या काही आठवणी सांगताना दिसणार आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली...
Uddhav Thackeray and Raj Thackeray: संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबतचे जुने फोटो दाखवण्यात आले. जुन्या फोटोंची एक एव्ही तयार करण्यात आली होती. एव्ही पाहताना राज ठाकरे काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. एव्ही संपल्यानंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? असा सवाल गुप्तेंनी राज ठाकरेंना विचारला. त्यानंतर मात्र राज ठाकरेंच्या शांत बसले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवार, शरद पवार आणि रिफायनरीवरही आपली भूमिका मांडली.