एक्स्प्लोर

14 Years Of Pavitra Rishta: 'पवित्र रिश्ता' मालिकेला झाली 14 वर्ष; अंकिता लोखंडेची खास पोस्ट, सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेला 14 वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

14 Years Of Pavitra Rishta: छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) मानव ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) अर्चना ही भूमिका साकारली. या मालिकेला 14 वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये अंकितानं सुशांतचा उल्लेख केला नाही, त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

अंकिताची पोस्ट


अंकितानं 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता ही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अंकितानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,पवित्रा रिश्ताची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी अर्चना होऊ शकते, असा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एकता कपूरचे आभार. अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल धन्यवाद. मला अजूनही लोक अर्चना नावानेच ओळखतात. मी खूप कृतज्ञ आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अंकितानं अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेचे 'आसमान मे जब तक सितारे रहेंगे ' हे टायटल साँग ऐकू येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

नेटकऱ्यांनी केलं अंकिताला ट्रोल 

अंकितानं तिच्या सोशल मीडियावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या पोस्टमध्ये सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं अंकिताच्या पोस्टला कमेंट केली, 'सुशांतचा उल्लेखही केला नाही. सुशांतचा एकही फोटो शेअर केला नाही. अंकिता मॅडम तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सुशांतची आठवण आली.'

14 जून 2020 रोजी सुशांत हा त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

इतर महत्वाच्या बातम्या: 

SSR Birth Anniversary : छोट्या पडद्यापासून सुरुवात; 'एम एस धोनी'पासून 'केदारनाथ'पर्यंत, असा होता सुशांत सिंह राजपूतचा प्रवास

 

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Aai Tuljabhavani: 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
Madhavi Nimkar Video: मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
Embed widget