Jhalak Dikhhla Jaa 10 : तीच अदा, तीच जादू... 20 वर्षांनी माधुरी थिरकली 'डोला रे डोला'वर, अमृतानेही दाखवला जलवा
Jhalak Dikhhla Jaa 10 : 'झलक दिखला जा 10'च्या मंचावर माधुरी दीक्षित नुकतील 'डोला रे डोला'वर थिरकताना दिसून आली आहे.
Jhalak Dikhhla Jaa 10 New Promo : 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa 10) हा कार्यक्रम पाच वर्षांनी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. सध्या 'डोला रे डोला' धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'झलक दिखला जा' या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. वेगवेगळे सेलिब्रिटी या कार्यक्रमाचं परिक्षण करत असतात. झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नृत्यांगना नोरा फतेही (Nora Fatehi) सांभाळत आहे.
'झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वात निया शर्मा (Nia Sharma), शिल्पा शिंदे (Shilpa Shinde), पारस कलनावत, नीति टेलर, गश्मीर महाजन आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या सेलिब्रिटींचा समावेश आहे. ते आपल्या नृत्याने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत आहेत.
View this post on Instagram
माधुरी दीक्षितचा धमाकेदार डान्स
'झलक दिखला जा 10'चा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये माधुरी वीस वर्षांपूर्वीच्या 'डोला रे डोला' या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. माधुरीसोबत अमृता खानविलकरदेखील 'डोला रे डोला'वर खिरकताना दिसत आहे. माधुरी आणि अमृताची अदा पाहून रोहित शेट्टी आणि नोरा फतेहीदेखील हैरान झाले.
माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय बच्चनसोबत (Aishwarya Rai Bachchan) 'देवदास' (Devdas) सिनेमात 'डोला रे डोला'वर थिरकताना दिसून आली होती. आजही माधुरीचा डान्स चाहते आवडीने पाहतात. वीस वर्षांनंतरदेखील माधुरी आणि ऐश्वर्या त्यांच्या नृत्याने चाहत्यांना वेड लावतात.
संबंधित बातम्या