Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले
आता मनोरंजनाची चव वाढणार आहे. कारण 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले असणार आहेत.
Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खवय्ये म्हटलं की एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले उत्तम खवय्ये आहेत. आता त्यांची ही खवय्येगिरी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झी मराठीवर लवकरच 'किचन कल्लाकार' हा कुकरी शो सुरू होणार आहे.
'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रामोमध्ये संकर्षण म्हणतो आहे,"आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार". त्यामुळे आता पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता हे कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
View this post on Instagram
प्रशांत दामलेंची या कार्यक्रमात नक्की काय भूमिका असणार आहे, याची चाहते प्रतीक्षा करत होते. या कार्यक्रमात प्रशांत दामले परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. कुठले कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवू शकले याचा अंतिम निर्णय हा प्रशांत दामले घेणार आहेत. त्यामुळे कलाकारांना आता खवय्या प्रशांत दामले यांना आपल्या पाक-कौशल्याने प्रभावित करणं किती कठीण जाणार जाणार आहे हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. कुकींगशी संबंधीत आगळावेगळा शो बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच येणार धमाकेदार कुकरी शो, 'संकर्षण कऱ्हाडे' सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
Salman Khan visits Sabarmati Ashram : 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान थेट बापूंच्या आश्रमात, चरखा चालवत म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha