Khatron Ke Khiladi 13 : रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मध्येही अर्चना गौतम-शिव ठाकरेचं वाजलं! ‘या’ कारणावरून झाला वाद
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान पुन्हा एकदा अर्चना गौतम आणि शिव ठाकरेचं वाजलं आहे.
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत या बहुचर्चित कार्यक्रमाचं शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचं एकमेकांसोबत वाद घालताना दिसले आहेत. याआधीदेखील 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमचं (Archana Gautam) चांगलच वाजलं होतं.
'बिग बॉस 16' प्रमाणे 'खतरों के खिलाडी 13'मधील शिव आणि गौतमची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दोघेही या कार्यक्रमात स्टंटबाजी करताना दिसत आहेत. पण खेळताना दोघांचं वाजलं असल्याने त्यांचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
शिव आणि अर्चनाचं वाजलं
मीडिया रिपोर्टनुसार,'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे सारखं कोणासोबत तरी वाद घालताना दिसत आहे. या शूटिंगदरम्यान त्याने अर्चना गौतमचा अपमान केला आहे. त्यामुळे अर्चनाला अश्रू अनावर झाले. सर्वांसमोर शिवने अर्चनाचा अपमान केल्याने तिला राग आला आणि तिने शिवला चांगलच सुनावलं आहे.
'खतरों के खिलाडी 13'मध्ये कोणते स्पर्धक आहेत?
'खतरों के खिलाडी 13'मध्ये रोहित बोस रॉय, डेजी शाह, शिव ठाकरे, अर्चना गौतम, अंजली आनंद, न्यारा बॅनर्जी, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, शीझान खान, डिनो जेम्स, रश्मीत कौर आणि सौंदस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच 'बिग बॉस 16'मधील अब्दु रोजिकची झलक प्रेक्षकांना या कार्यक्रमातदेखील पाहायला मिळणार आहे.
'खतरों के खिलाडी 13'मध्ये दिसणार अब्दू रोजिक!
मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 13'च्या निर्मात्यांनी अब्दू रोजिकला विचारणा केली आहे. अब्दूने 'खतरों के खिलाडी'साठी होकार दिला तर तो या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सहभागी होऊ शकतो. 'खतरों के खिलाडी 13'मध्ये तो स्टंटबाजी करताना दिसून येईल. शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकचा मोठा चाहतावर्ग असून 'बिग बॉस 13'मधील (Bigg Boss) त्यांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या जोडीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे ही जोडगोळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'खतरों के खिलाडी 13' या बहुचर्चित कार्यक्रमाचं लवकरच प्रसारण होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक घरबसल्या हा कार्यक्रम पाहु शकतात.
संबंधित बातम्या