Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील कर्णिकांनी घेतलं लालबागच्या राजाच्या दर्शन; विशेष भाग रंगणार 8 सप्टेंबरला
Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतील राघव, चिंगी आणि आनंदीने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आता पर्यंतच्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं आहे की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला आहे. त्यामुळे रमा सहित सर्व मंडळी फारच खुश आहे. आता मालिकेतील राघव, चिंगी आणि आनंदीने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल की, चिंगीला तिच्या मित्र मैत्रिणीं सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं आहे आणि आनंदीचीदेखील तशी इच्छा आहे. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो.
View this post on Instagram
लालबागच्या राजाच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवावर मालिकेचा लेखक प्रह्लाद कुडतरकर म्हणाला,"लालबागच्या राजाचा विजय असो.." ही घोषणा करत, ऐकत गिरणगावात बालपण गेलं.. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा.. तोच आताही आहे.. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं शुटींग ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली.. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी.. त्याची सगळ्यांना असणारी ओढ.. यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं.. पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने "नवा गडी नवं राज्य" या मालिकेचं चित्रीकरण झालं.. त्यामागे अर्थातच सगळ्या टीमची मेहनत आहे".
'नवा गडी नवं राज्य' या मालिकेचा लालबाग विशेष भाग 8 सप्टेंबर ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रात्री 9 वाजता प्रेक्षक हा लालबाग विशेष भाग पाहू शकतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेनंतर दोन वर्षांनी प्रेक्षकांना त्यांची आवडती अभिनेत्री अनिता दातेला पुन्हा एकदा 'नवा गाडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून एका नवीन भूमिकेत पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या























