Kapil Sharma: कपिल शर्मा पुन्हा अडचणीत? द ग्रेट इंडियन कपिल शोला BBMFची नोटीस, रविद्रनाथांच्या वारशाचा अपमानाचा ठपका
कपीलनंतर सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसलाही अशीच नोटीस पाठवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. यावर सलमानच्या टीमनं खुलासा केला आहे.
Kapil Sharma: मनोरंजनविश्वातला द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (the Great Indian Kapil Show) सध्या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. त्याच्या शोमध्ये येणाऱ्या कलाकारांना विनोदाच्या नावाखाली चूकीची वक्तव्य करत वागणूक दिल्यावरून चर्चेत असताना अलीकडेच बोंगो भाषा महासभा फाउंडेशनने (BBMF) 'द ग्रेट इंडियन कपिल शो'वर नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या वारशाचा अपमान केल्याचा आणि सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी कारणे दाखवा नोटीसही त्याला पाठवली आहे. कपीलनंतर सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसलाही अशीच नोटीस पाठवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. यावर सलमानच्या टीमनं खुलासा केला असून सलमान खानचा किंवा त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलंय.
काय आलीये नोटीस?
अलीकडेच, डॉ. मंडळाच्या वतीने कायदेशीर सल्लागार नृपेंद्र कृष्ण रॉय यांनी जारी केलेल्या नोटीशीत असा दावा केला गेलाय की द ग्रेट इंडियन कपिल शो रवींद्रनाथ टागोर यांच्या आदरणीय वारशाचा अपमान करत सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावत असल्याचं यात म्हटलंय. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसबद्दल वृत्त आहे की त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे, परंतु कंपनीच्या प्रतिनिधीने नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या शोशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नक्की काय वाद आहे?
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकने एक स्किट सादर केल्याची माहिती आहे, त्यामुळे बंगाली समुदाय संतप्त झाला असून कृष्णा अभिषेकने रवींद्रनाथ टागोरांचे 'एकला चलो रे' हे गाणे गायल्याचे सांगण्यात आले. या गाण्याची त्यानं चेष्टा केल्याचं सांगण्यात येत आहे. यावर बंगाली कवी सृजतोही संतापल्याचं सांगितलं जातंय आणि यावरून त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबतही वक्तव्य केलं होतं अशी माहिती आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर कथित टिप्पण्यांसाठी सेलिब्रिटी चॅट शोच्या अलीकडील भागांपैकी एकावरून वाद सुरू झाला आहे. हा भाग 26 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या भागात मुख्य कलाकार क्रिती सेनन, काजोल आणि शाहीर शेख यांच्यासह दो पत्तीची टीम आली होती. कृष्णा अभिषेकने जॅकी श्रॉफची बंगाली उच्चारात नक्कल केली. बंगाली असलेल्या काजोलसाठी ही गझल मांडण्यात आली होती. टागोरांचे प्रतिष्ठित देशभक्तीपर गाणे एकला चलो रे गीत हास्यास्पद पद्धतीनं सादर केल्यामुळे त्याच्यावर बंगाली समाज नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
सलमानच्या टीमनं केला खुलासा
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोसहित सलमानच्या SKTV या प्रोडक्शन हाऊसलाही नोटीस मिळाली आहे. पण याबाबत सलमानच्या प्रोडक्शन हाऊस टीमने नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'शी आमचा काहीही संबंध नाही असं म्हणलंय.