एक्स्प्लोर
मलायकावर क्रश होता, पण.... : के एल राहुल
'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सिझनमध्ये क्रिकेटपटू के एल राहुलसोबत हार्दिक पांड्याने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री मलायका अरोरावर माझा क्रश होता, पण अर्जुन कपूर आणि मलायकाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्यापासून तो संपला, अशी कबुली के एल राहुलने दिली
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरावर माझा क्रश होता, पण अर्जुन कपूर आणि मलायकाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्यापासून तो संपला, अशी प्रांजळ कबुली क्रिकेटपटू के एल राहुलने दिली आहे. 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सिझनमध्ये के एल राहुलसोबत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने शोमध्ये उपस्थिती लावली होती.
के एल राहुल आणि हार्दिक यांच्या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दोघं एकमेकांचे पाय खेचताना दिसत आहेत.
'तुम्ही दोघं रिलेशनशीपमध्ये आहात का?' असा सवाल आपल्याला आणि हार्दिक पांड्याला अनेक जण विचारतात, असंही के एल राहुल म्हणाला. 'दोन देखणे तरुण एकत्र का आहेत? असं विचारलं, की कोणी मिळत नाही म्हणून एकत्र शोधतोय' असं उत्तर देत असल्याचं हार्दिकने सांगितलं.
चीअरलीडर्समुळे कोणाचं चित्त विचलित होतं, असा प्रश्न करणने विचारला. त्यावर हार्दिकने कोणाचंच नाही, असं उत्तर दिलं. 'तो सतत त्यांच्यासोबतच असतो, मग मॅचमध्ये कसं लक्ष विचलित होईल?' असं के एल राहुल म्हणताच हशा पिकला. हार्दिकच एकच मेसेज वेगवेगळ्या तरुणींना पाठवायचा, असं गुपितही के एल राहुलने उलगडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement