'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा', आता कानाकोपऱ्यात दुमदुमणार 'Indian Idol Marathi'चा आवाज, अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत
उद्यापासून 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत अजय-अतुल असणार आहेत.
Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सोनी मराठीवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' असे 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. संगीतविश्वातली नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.
View this post on Instagram
'इंडियन आयडल' या रिअॅलिटी शोचं पहिलं वहिलं मराठी पर्व असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह स्पर्धकांमध्येदेखील उत्सुकता दिसत आहे. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक आणि गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.
View this post on Instagram
अजय-अतुल यांनी मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव कमवलं. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत. आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न आता 'इंडियन आयडल मराठी' कार्यक्रमाद्वारे साकार होणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे. उत्कृष्ट स्पर्धक, अनुभवी परीक्षक यांना घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास पाहण्याजोगा असणार आहे.
संबंधित बातम्या
अजय-अतुलने हास्यजत्रेच्या मंचावर लावली हजेरी, अतुल साकारणार विनोदी भूमिका
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha