Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला
Bigg Boss 15 : कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकलेची हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
Bigg Boss 15 : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात लक्षवेधी ठरलेलं नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. सातारा जिल्ह्यातील राजकारणानंतर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता थेट सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमध्ये दिसणार आहेत. 'बिग बॉस 15' कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. पण अभिजीत बिचुकलेंच्या एन्ट्रीमुळे या चर्चांना जोर आला आहे.
अभिजीत बिचुकलेने कवी मनाचे नेते अशी ओळख मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात केली होती. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्यावेळी जाणारे बिचुकले हे एकमेव राजकीय नेते होते. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता. मराठी बिग बॉसमधील एका टास्क दरम्यान अभिजीत बिचुकले म्हणाला होता,"मी हा खेळ सोडत आहे. असले फालतू खेळ मला खेळायचे नाहीत".
View this post on Instagram
बिग बॉस मराठीमुळे अभिजीत बिचुकलेची महाराष्ट्राचा चांगलीच ओळख झाली होती. आता हिंदी बिग बॉसमध्ये बिचुकले वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कलर्सने शेअर केलेल्या सलमान खान, महेश मांजरेकर आणि अभिजीत बिचुकले दिसत आहेत. 'अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री' अशी बिचुकलेची ओळख केली आहे. अभिजीत बिचुकले ओळख करून देताना म्हणत आहे,"आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम...". त्यावर महेश मांजरेकर म्हणाले,"यू वाँट टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया". त्यावर बिचुकले होकार देत आहे. त्यानंतर मांजरेकर सलमानला म्हणाले,"अभी बोल क्या करेगा तू". त्यावर सलमान चक्रावलेला दिसतो.
संबंधित बातम्या
अभिजीत बिचुकले बिग बॉसमध्ये पुन्हा दिसणार नाही? न्यायालयाने जामीन फेटाळला
Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?
Shreya Bugde : श्रेया बुगडे करणार बिग बॉसमध्ये एन्ट्री? फोटोमुळे चर्चा रंगल्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha