एक्स्प्लोर

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुमारे सव्वा दोन वर्षे सुरु असलेल्या या मालिकेने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 500 भाग पूर्ण केले. आता फेब्रुवारी अखेरीस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मुंबई : झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळणार आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं. 25 सप्टेंबर 2017 रोजी खासदार अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर आणला. संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला. आता मालिका संपत असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ ट्वीट करत 'एक प्रवास कधीच न विसरता येणारा……' असं कॅप्शन दिलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर डॉ. अमोल कोल्हे मालिकांतून विश्रांती घेणार 'शिवबंधन' तोडून घड्याळ हाती "सुरु झालेला प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच असतं. काही प्रवास मात्र खूप काही देऊन जातात. खूप काही शिकवतात. कर्तव्यपूर्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात. असाच एक प्रवास काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा. स्वराज्यरक्षक संभाजी," असं अमोल कोल्हे या व्हिडीओमध्ये बोलत आहेत. खरंतर मालिकेच्या शेवटच्या प्रसंगाचं चित्रीकरण 31 जानेवारीलाच पूर्ण झालं आहे. तर येत्या 14 फेब्रुवारीला मालिकेची संपूर्ण टीम वढू बुद्रूक इथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. हे आपल्याला मालिकेच्या शेवटच्या भागात म्हणजेच 28 फेब्रुवारीला पाहायला मिळेल. दरम्यान मालिकेचं शूटिंग पूर्ण होताच अमोल कोल्हेने आपला लूकही बदलला आहे. ही मालिका सुरु असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget