Har Har Mahadev: झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक: हर हर महादेवच्या टेलिव्हिजन प्रिमिअरबद्दल दिला अखेरचा इशारा
आज स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद साबळे आणि श्री अंकुश कदम यांनी झी स्टुडीओच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे.
Har Har Mahadev: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेसह (Swarajya Sanghatana) राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे.
आज स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद साबळे आणि श्री अंकुश कदम यांनी झी स्टुडीओच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे. हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची लेखी हमी त्यांनी मागितली असून, छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास झी स्टुडीओ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता इशारा
"हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला होता.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; संभाजीराजेंचा इशारा