एक्स्प्लोर

Ganeshotsav 2022  : कुणी स्वतःच्या हाताने गणपती घडवतं, तर कुणी मोदकांची वाट बघतं! लाडके कलाकार सांगतायत बाप्पाच्या आठवणी

 Marthi Serials : सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, अशा सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून, कलाकारही त्यासाठी सज्ज झाले आहेत.

Marthi Serials : सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, अशा सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून, झी मराठीवर येत असलेल्या नवीन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब, धनश्री काडगावकर, शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम यांनी आपआपल्या घरी गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कसा साजरा केला जातो, या बद्दलच्या आपल्या आठवणी सांगितल्या केल्या आहेत.

बाप्पाच्या आशीर्वादाने झाली करिअरची सुरुवात : दीपा परब

‘तु चाल पुढं’ या मालिकेत 'अश्विनीच्या' भूमिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) सांगते, ‘गणपती मला खूप प्रिय आहे. मी लोअर परळला राहायचे माझ्या करियरची सुरवात गणेशोत्सवापासूनच झाली. या उत्सवात कार्यक्रम करून मी माझ्या करियरचा श्रीगणेशा केला. माझ्या घरी गणपती येत नाही, पण घरी देवघरातल्या गणपतीची मी मनोभावे पूजा करते. मोदक आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य त्याला असतो. या वर्षी मी 'तू चाल पुढं' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत आहे, ते सुद्धा या गणरायाच्या आशीर्वादानेच!

गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं, पण भाव तोच! : धनश्री काडगावकर

याच मालिकेतील 'शिल्पी' या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanshri Kadgaonkar) आपल्या आठवणीत रमताना सांगते की, ‘लहानपणापासून ते आतापर्यंत आमच्या घरी गणेशोत्सवाची लगबग दहा-पंधरा दिवस आधीपासूनच सुरु होते. माझ्या माहेरी गौरी गणपती असल्यामुळे मी सजावटीची तयारी करायचे, सगळे मिळून गणपती बाप्पाची मूर्ती आणायचो.  गणेशोत्सवादरम्यान मोदकांसह वेगवेगळे पदार्थ करायचो आणि आनंदाने संपूर्ण गणेशोत्सव साजरा करायचो. मी लहापणी सोसायटीत साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सवातील स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. तिथूनच मला माझ्यातील कलाकाराची ओळख झाली, असे मला वाटते. वेळ बदलत गेली त्याप्रमाणे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले. परंतु, आताही मी लहानपणीप्रमाणेच गणेशोत्सवाचा आनंद घेते.’

यंदा मी बाप्पाचं दर्शन घेणारच : शिवानी नाईक

'अप्पी आमची कलेक्टर' या नव्या मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) म्हणजे ‘अप्पी’ गणेशोत्सवाबद्दल भरभरून सांगते की, ‘गणरायाचे आगमन होणार या कल्पनेनेच खूप उत्साह निर्माण होतो. सगळेजण जोरात तयारीला लागतात. माझ्या घरी देवघरातच गणपतीची स्थापना होत असे. परंतु, गेल्या वर्षीपासून अगदी व्यवस्थित सजावट करून गणपतीची स्थापना केली जाते. दुकानात जाऊन गणपतीची मूर्ती शोधणे, त्याला घरी घेऊन येत असतानाचा पायी प्रवास खूप आनंद देणारा असतो. घरी आल्यावर आई त्याचे अगदी प्रेमाने औक्षण करते. गणरायाला आवडणारे उकडीचे व तळणीचे मोदक तसेच, अनेक गोडाचे पदार्थ करून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी मी एक दिवसासाठी का होईना घरी जाऊन, बाप्पाला भेटून त्याचा आशीर्वाद घेणार आहे.’ 

बाप्पासोबत मीही 21 मोदक खायचो : रोहित परशुराम

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अभिनेता रोहित परशुराम (Rohit Parshuram) म्हणजे ‘अर्जुन’ आपल्या आठवणी सांगताना म्हणाला, ‘मला पाच वर्षांच्या महेनतीचं फळ या मालिकेच्या माध्यमातून मिळालं आहे. मी मूळचा भोरचा आहे, तिथे खूप दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पूर्वी गणेशोत्सवात नाटुकली, देखावे असायचे. त्यात माझ्या भावाचाही सहभाग असायचा. मी लहानपणी नागपंचमीसाठी मातीचे नाग, बैलपोळ्यासाठी बैल, तसेच गणेशोत्सवासाठी छोटी गणपती मूर्ती ही बनवायचो. ती फार सुबक नसली, तरीही छान असायची. तो आनंद काही वेगळाच असायचा. गणपतीत बाप्पासोबत मीही 21 मोदक खातो. लालबागच्या राजावर माझी नितांत श्रद्धा असून, बाप्पाची माझ्यावर खूप कृपा आहे, असे मला मनोमन वाटते. सगळ्यांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.’

हेही वाचा :

Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये गणरायाचे थाटामाटात आगमन; रंगणार विशेष भाग

Ganeshotsav 2022  : मालिका विश्वात बाप्पाचं थाटात होणार आगमन, पारंपरिक पद्धतीने साजरा करणार गणेशोत्सव!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
Embed widget