एक्स्प्लोर

Ganeshotsav 2022  : मालिका विश्वात बाप्पाचं थाटात होणार आगमन, पारंपरिक पद्धतीने साजरा करणार गणेशोत्सव!

Marathi Serials  : गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो. मालिका विश्वातही यंदा गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे.

Marathi Serials  : गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो. मालिका विश्वातही यंदा गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. स्टार प्रवाहाचं कानेटकर कुटुंब आणि ‘झी मराठी’चं कर्णिक कुटुंब यांचा यंदाचा गणेशोत्सव खास अनार आहे. दोन्ही कुटुंबात नव्या सुनांचे आगमन झाले आहे. यावर्षी दोन्ही मालिकेतील जोड्या त्यांचा पहिला गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. कानेटकर कुटुंबात प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. यंदा बाप्पाच्या उत्सवासाठी पर्यावरण पुरक मूर्ती तर असणारच आहे पण यासोबतच बाप्पाचा देखावाही घरातल्याच वस्तूंपासून बनवण्यात आला आहे.

कानेटकर कुटुंब मिळून गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी

अप्पू, शशांक आणि कुक्की गँगने एकत्र येऊन टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत बाप्पाच्या सजावटीसाठी वाड्याचीच प्रतिकृती तयार केली आहे. आता संपूर्ण कानेटकर कुटुंब मिळून गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करणार आहेत. कानेटकर कुटुंबात सुग्रास नैवेद्याची रेलचेल असेलच. पण, सोबतीला भजनाचा खास कार्यक्रम देखील रंगणार आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरे करण्यात खरा आनंद दडलेला असतो. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि यातील प्रत्येक पात्र म्हणूनच प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

कर्णिक कुटुंबाचा बाप्पा असणार खास!

झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. आतापर्यंतच्या भागात कर्णिकांच्या घरात आनंदी स्थिरता आणण्याचा प्रयत्न करताना दिसली होती. रमाच्या आणि आनंदीच्या कुरापतींमध्ये त्यांची एका गोष्टीवर एक वाक्यता होते आणि ती म्हणजे दोघींची गणपती बाप्पावरची अपार श्रद्धा. आनंदीला कळते की, राघवने रमा गेल्यापासून गणपतीची स्थापना केली नाही. पण, आता आनंदी ठरवते की, तिच्या स्वतःच्या व रमाच्या इच्छेसाठी, तसेच कौटुंबिक आनंदासाठी पुन्हा गणपती बाप्पा घरात आणायचे आहेत. तर आता सहा वर्षानंतर बाप्पा पुन्हा एकदा कर्णिकांच्या घरी विराजमान होणार आहेत. कर्णिकांकडे अत्यंत आनंदात होणारे बाप्पाचे आगमन प्रेक्षकांना घरी बसून पाहता येणार आहे.

हेही वाचा :

Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये गणरायाचे थाटामाटात आगमन; रंगणार विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajingar Voting : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची तयारी पूर्णSanjay Raut Full PC  : राज हे मोदी, शाह, फडणवीस या राज्याच्या शत्रूंना मदत करतायत, संजय राऊतांचा आरोपAnil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget