Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये गणरायाचे थाटामाटात आगमन; रंगणार विशेष भाग
Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये गणरायाचे थाटामाटात आगमन होणार आहे.
Marathi Serial : बाप्पाच्या आगमानाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्या पासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड पदार्थ सगळ्याची तयारी सुरु झाली आहे. मराठी मालिकांमध्येदेखील गणरायाचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे.
'भाग्य दिले तू मला', 'राजा रानीची गं जोडी', 'जीव माझा गुंतला', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'नवा गडी नवं राज्य' या मालिकांमध्ये विशेष भाग बघायला मिळणार आहे. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सूरवीर गणरायासाठी सुरेल गाणी सादर करणार आहेत.
'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहितेंच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नमाला यांना बाप्पाचा संकेत मिळणार आहे. कावेरी, राज आणि घरातील सगळे मिळून सजावटीची तयार करताना दिसणार आहेत. रत्नमाला, कावेरी खास बाप्पासाठी मोदक बनवणार आहेत. 'जीव माझा गुंतला' मालिकेत खानविलकरांच्या घरात गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे.
View this post on Instagram
सगळे मिळून बाप्पाची पूजा करणार आहेत, नैवेद्य दाखवला जाणार आहे. मल्हार - अंतरा मिळून आरती करणार आहेत. पण, याच दरम्यान घरात मेघ देखील घरात येणार आहे. आता मेघच्या येण्याने कोणते संकट येईल ? हे कळेलच. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत लतिका आणि अभि मिळून गणरायाची स्थापना करणार आहेत. अभिलाषा अभिमन्यूच्या विरोधात काही तरी कट कारस्थान करताना दिसणार आहे. आता हे आलेलं विघ्न कसं दूर होईल? काय आहे नक्की अभिलाषाच्या मनामध्ये? हे मालिकेमध्ये बघायला मिळेल.
'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. आता पर्यंतच्या भागात कर्णिकांच्या घरात आनंदी स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते आहे. रमाच्या आणि आनंदीच्या कुरापतींमध्ये त्यांची एका गोष्टीवर एक वाक्यता होते आणि ती म्हणजे दोघींची गणपती बाप्पा वरची अपार श्रद्धा. आनंदीला कळते की राघवने रमा गेल्या पासून गणपतीची स्थापना केली नाही. पण आता आनंदी ठरवते कि तिच्या स्वतःच्या व रमाच्या इच्छेसाठी तसेच कौटुंबिक आनंदासाठी पुन्हा गणपती बाप्पा बसवायचे. तर आता सहा वर्षानंतर बाप्पा पुन्हा एकदा कर्णिकांच्या घरी विराजमान होणार आहे.
संबंधित बातम्या