(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या शीर्षक गीताची सोशल मीडियावर चर्चा
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' या मालिकेचे शीर्षक गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकरने संगीतबद्ध केलं आहे.
'तू तेव्हा तशी' मालिकेच्या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षकगीत यशस्वी होण्यामागे पडद्यामागील सर्व तत्रंज्ञाचादेखील तितकाच महत्वपूर्ण वाटा आहे. 'तू तेव्हा तशी' ही मालिका येत्या 20 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) मुख्य भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
शीर्षकगीताबद्दल बोलताना समीर म्हणाला, "एखादी धून रचण्यासाठी पुरेसा वेळ लागतो तसंच या शीर्षकगीताची संकल्पना जवळपास चार महिन्यांपूर्वी ठरली होती आणि पहिल्यांदाच एखाद्या गीताच्या चालीवर मी चार महिने काम केलंय. मी अभिषेकला शीर्षक गीताची धून पाठवायचो आणि त्यावरून तो ते शब्दबद्ध करायचा, अशा पद्धतीने फक्त फोनवरून संवाद साधून हे शीर्षकगीत तयार केलं. पुढे अवघ्या काही दिवसांतच या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांना हे शीर्षकगीत प्रचंड आवडलं आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतंय याचा खूपच आनंद आहे."
संबंधित बातम्या