Dhanashree Verma : 'झलक दिखला जा 11' च्या ग्रँड फिनाले आधी धनश्री वर्मावर कोसळला दु:खाचा डोंगर, घरातील या सदस्याचे निधन
Dhanashree Verma : झलक दिखला जा 11' च्या ग्रँड फिनाले आधी धनश्री वर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Dhanashree Verma News : 'झलक दिखला जा 11' मध्ये (Jhalak Dikhhla Jaa 11) कोरिओग्राफर धनश्री वर्माने (Dhanashree Verma) आपल्या नृत्याने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. दर आठवड्याला तिच्या परफॉर्मन्सला परीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळत आहे. धनश्री आता शोच्या ग्रँड फिनालेमध्ये दाखल झाली आहे. मात्र, त्याआधीच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
धनश्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला
धनश्रीच्या कुटुंबातील एका खास सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे धनश्री काहीशी खचली आहे. याची माहिती स्वतः धनश्रीने तिच्या सोशल मीडियावर दिली आहे. धनश्रीच्या आजीचे (आईची आई) निधन झाले आहे. आजीसोबत तिचे खास बाँडिंग होते.
धनश्रीने पोस्ट शेअर करून माहिती दिली
धनश्रीने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली. धनश्रीने आजीसोबत घालवलेले क्षण तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमच्या आयुष्यात इतक्या मोठ्या आजारांशी लढल्यानंतर तुम्ही मोठ्या उत्कटतेने लढलात. तू माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक होती. आज मी जी काही आहे, याचे संपूर्ण श्रेय फक्त तुलाच जाते. तुमच्या आशीर्वादानेच सर्व काही शक्य झाले असल्याची भावूक पोस्ट धनश्रीने लिहिली आहे.
View this post on Instagram
धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, तुच माझे नाव धनश्री ठेवले हे मी कधीही विसरू शकत नाही. माझी प्रिय आजी, माझी योद्धा, तुला श्रद्धांजली असे धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
झलक दिखला जा 11 ची ग्रँड फिनाले कधी?
'झलक दिखला जा 11' मध्ये धनश्रीने फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. तिच्यासोबत मनीषा राणी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्रा यांनीही स्थान मिळवले आहे. शोची ग्रँड फिनाले 3 मार्च रोजी होणार आहे.