Ekta Kapoor : एकता कपूरसह आई शोभावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, अल्ट बालाजीवरील गंदी बात सीरीजमुळे अडचणीत वाढ
ALT Balaji Gandi Baat 6 : एकता कपूर आणि शोबा कपूर यांच्याविरोधात मुंबईच्या M.H.B पोलीस स्टेशनमध्ये POSCO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ekta Kapoor POCSO Complaint : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीवरील गंदी बात 6 वेब सीरीजमुळे एकता कपूर अडचणीत आली आहे. एकता कपूर आणि शोबा कपूर यांच्याविरोधात मुंबईच्या M.H.B पोलीस स्टेशनमध्ये POSCO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'गंदी बात' वेब सीरीजमुळे एकता कपूरच्या अडचणीत वाढ
अभिनेत्री एकता कपूर आणि त्यांच्या आई विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.'अल्ट बालाजी' (ALT Balaji) ओटीटी प्लॅटफॉर्मच्या गंदी बात वेब सीरीजच्या सीजन 6 मध्ये लहान मुली सोबत अश्लील सीन्स करण्यात आला होता, याप्रकरणी एकता कपूर आणि त्यांची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकता कपूरसह तिच्या आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अल्ट बालाजीवरील गंदी बात 6 वेब सीरिजमध्ये 2021 फेब्रुवारी ते एप्रिल 2021 च्या मध्ये हा एपिसोड दाखवण्यात आला होता. याच प्रकरणांमध्ये एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली होती, या तक्रारीचा अनुषंगाने एम.एच.बी पोलिसांकडून एकता कपूर आणि तिची आई शोधा यांच्याविरोधात POSCO आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :