Chala Hawa Yeu dya : 'चूक भूल द्यावी घ्यावी', 10 वर्षांनी 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर, कुशलने शेअर केली भावनिक पोस्ट
Chala Hawa Yeu dya : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने अखेर 10 वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्याचपार्श्वभूमीवर कुशल बद्रिकेने एक भावनिक पोस्ट शेअर केलीये.
![Chala Hawa Yeu dya : 'चूक भूल द्यावी घ्यावी', 10 वर्षांनी 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर, कुशलने शेअर केली भावनिक पोस्ट Chala Hawa Yeu dya Zee Marathi Programme Off Air after 10 years Kushal Badrike Shared an emotional post on Social Media detail marathi news Chala Hawa Yeu dya : 'चूक भूल द्यावी घ्यावी', 10 वर्षांनी 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर, कुशलने शेअर केली भावनिक पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/18/a61387ba694d724a343c2e98a9a9d9a11710745392831720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chala Hawa Yeu dya : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर प्रेक्षकांना ज्या कार्यक्रमाने खळखळून हसवलं त्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. याच पार्श्वभूमीवर कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केलीये. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत या कार्यक्रमाला निरोप दिलाय.
कुशलने चला हवा येऊ द्याच्या मंचावरचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलाय. त्याला कुशलने निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी हे गाणं टाकलं आहे. तसेच या व्हिडिओला कुशलने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार.“चूक भूल द्यावी घ्यावी”, असं कॅप्शन कुशलने या व्हिडिओला दिलंय.
View this post on Instagram
चला हवा येऊ द्या पुन्हा परतणार?
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम मागील 10 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण त्यापूर्वी चॅनलकडून या कार्यक्रमासंदर्भात एक अपडेट समोर आली होती. कारण चॅनलकडून आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत असं सांगण्यात आलं आहे. . त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सुरु होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कार्यक्रम
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अंकुर वाढवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. थुकटरवाडी, पोस्टमन, 'होऊ दे व्हायरल','सेलिब्रिटी पॅटर्न','लहान तोंडी मोठा घास' असे अनेक पर्व, मराठीसह बॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन अशा अनेक गोष्टींची प्रेक्षकांना आता आठवण येईल. पण तीन महिन्यांनी पुन्हा हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)