एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव, अभिनेत्याने लग्न करण्यासाठी स्वीकारला मुस्लिम धर्म; आता बिग बॉसच्या घरात करणार एन्ट्री

Bigg Boss New Season : बिग बॉस 18 शोमध्ये अभिनेता विवियन डिसेनाही सामील होणार आहे. आज 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड प्रीमियर होईल.

Bigg Boss New Season : टीव्हीवरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त बिग बॉस शोच्या नवीन सीझनला  आज सुरुवात होणार आहे. सलमान खानच्या बिग बॉस 18 शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 18 शो सलमान खोन होस्ट करणार नसल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती, मात्र आता सलमान खान छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज आहे. यंदा शोमध्ये कोणते सदस्य सहभागी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कलर्स टीमने सोशल मीडियावर सदस्याचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता विवियन डिसेना बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं दिसत आहे.

या मालिकेतून अभिनयाला सुरुवात

अभिनेता विवियन डिसेना टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. विवियन डिसेनाने 'कसम से' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. या मालिकेतील त्यांची भूमिकाही लोकांना खूप आवडली. यानंतर विवियन 'प्यार की ये कहानी' टीव्ही मालिकेमध्ये झळकला होता. ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली, विवियनच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम आणि दाद दिली. या मालिकेमध्ये विवियनने व्हॅम्पायरची भूमिका साकारली होती, जी त्या काळात लोकांना खूप आवडली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

विवियन मधुबाला या मालिकेमध्येही मुख्य भूमिकेत झळकला. याशिवाय शक्ती-अस्तित्व के एहसासमध्येही त्याने उल्लेखनीय काम केलं. विवियनने गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. पण यावेळी तो पुन्हा छोट्या पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे. विवियन डिसेना आता बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे.

वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत

अभिनेता विवियन डिसेना प्रोफोशनल लाईफप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेकांना माहित नसेल पण, विवियनने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. विवियनने 2013 मध्ये टीव्ही अभिनेत्री वहबिज दोराबजीशी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार टिकलं नाही. यानंतर 2021 मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. 

दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला

अभिनेत्री वहबिझ दोराबजीपासून घटस्फोट घेतल्यानंतर विवियननं दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नासाठी विवियनने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. यानंतर विवियनने 2022 मध्ये इजिप्शियन पत्रकार नूरन अलीशी लग्न केलं. यासाठी त्याने धर्म बदलला. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 2019 मध्ये त्याने रमजान महिन्यापासून इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली आणि तो दिवसातून पाच वेळा नमाजही अदा करतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये गाढवाचीही एन्ट्री, सदस्यांसोबत घरातच राहणार, एका स्पर्धकासोबत आहे खास कनेक्शन

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Embed widget