एक्स्प्लोर

झापुक झुपूक सूरज चव्हाणसोबत दिसली 'ती'; म्हणाला, "तू तर माझी हिरोईन हाय...", VIDEO

BB Marathi Winner Suraj Chavhan: बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाण आपल्या गावी म्हणजे, बारामतीत पोहोचला. त्यावेळी त्याला भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavhan : नुकतंच मराठी बिग बॉसची (Bigg Boss Marathi 5) सांगता झाली. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाची ट्रॉफी बारामतीच्या (Baramati) गुलिगत झापुक झुपूक फेम सूरज चव्हाण (Suraj Chavhan) यानं उंचावली. बिग बॉसच्या संपूर्ण पर्वात सोशल मीडियावर सूरज चव्हाणचीच चर्चा होती. बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी घेऊन आपल्या गावी पोहोचला. त्यावेळी अख्ख्या बारामतीत जल्लोष पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात सूरजच्या तोंडी नेहमीच पिल्लू, बच्चा असे शब्द होते. तर, अनेकदा त्याच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. अशातच आता सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सूरज चव्हाण एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. सूरजचा व्हिडीओ पाहून हीच आमची वहिनी शोभेल, वहिनी सापडली, अशा कमेंट्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाण आपल्या गावी म्हणजे, बारामतीत पोहोचला. त्यावेळी त्याला भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आपल्या गावी पोहोचल्यावर त्याला अनेकजण भेटण्यासाठी आले होते. त्या गर्दीत 'ती'सुद्धा होती. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरज आणि तिला पाहून नेटकऱ्यांनी सूरजला लग्नाचा सल्ला दिला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kajal Shinde (@kajjushinde)

"तू माझी हिरोईन आहेस..."

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती सूरजला विचारते की, "विसरलाय होय मला". त्यावर सूरज थोडं लाडून नकार देतो आणि म्हणतो की, "तू माझी हिरोईन आहेस..." त्यावर ती म्हणते, "मला वाटलं की तू मला विसरलास...", तेवढ्यात इतर कुणीतरी म्हणतं की, निक्की त्याची बहीण आहे... त्यानंतर ती सूरजचं अभिनंदन करते आणि असाच आयुष्यात पुढे जा, असं म्हणते. 

व्हिडीओमध्ये सूरजसोबत दिसणारी 'ती' कोण? 

सूरज चव्हाणसोबत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचं नाव काजल शिंदे आहे. काजल स्वतः एक इन्फ्लुएन्सर असून यापूर्वी तिनं सूरजसोबत अनेक रिल्स आणि व्हिडीओमध्ये काम केलं आहे. सूरज ट्रॉफी घेऊन गावी परतल्यावर काजल त्याला भेटण्यासाठी आली होती. तिनं सूरजसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि शेवटी त्याचं अभिनंदन केल आणि आयुष्यात पुढे जा, असंही त्याला म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant : बिग बॉसची मानाची ट्रॉफी सूरजकडे, तर अभिजीत सावंतला मिळाली 'लय भारी' ट्रॉफी; पोस्ट करत म्हणाला, "मी तुमचं मन जिंकलं..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Fact Check : वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वनOne Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Fact Check : वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
वेटिंग तिकिटाचा नियम, रेल्वे प्रवासाबाबत फेक दावा व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
Embed widget