![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss Marathi : संग्राम चौगुलेचा गुलिगत सूरजला फुल्ल सपोर्ट; 'अरबाज आणि निक्कीची वाजवायला आलाय', वाईल्ड कार्ड एन्ट्रीवर बिग बॉस प्रेमींच्या भन्नाट प्रतिक्रिया
Bigg Boss Marathi New Season 5 : बिग बॉस मराठीच्या संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री झाल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत
![Bigg Boss Marathi : संग्राम चौगुलेचा गुलिगत सूरजला फुल्ल सपोर्ट; 'अरबाज आणि निक्कीची वाजवायला आलाय', वाईल्ड कार्ड एन्ट्रीवर बिग बॉस प्रेमींच्या भन्नाट प्रतिक्रिया Bigg Boss Marathi Wild Card Entry Sangram Chougule netizens Reaction Suraj Chavan marathi news Bigg Boss Marathi : संग्राम चौगुलेचा गुलिगत सूरजला फुल्ल सपोर्ट; 'अरबाज आणि निक्कीची वाजवायला आलाय', वाईल्ड कार्ड एन्ट्रीवर बिग बॉस प्रेमींच्या भन्नाट प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/10/b68292093defd263dde121a7dce69dab1725968257608322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Day 45 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात संग्राम चौगुलेच्या येण्याने बदल झालेला पाहायला मिळणार आहे. संग्रामच्या येण्याचा काहींना आनंद झाला आहे तर काहींना मात्र त्याचा खेळ पटलेला दिसून येत नाही. आजच्या भागात घरातील काही मंडळी संग्रामचं कौतुक करताना दिसणार आहेत. सोशल मीडियावरदेखील संग्रामची चांगलीच हवा आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात त्याचा बोलबाला पाहायला मिळेल. संग्राम आता गुलिगत सूरजला सपोर्ट करताना दिसत आहे. संग्राम सूरजला गेमबद्द्ल टीप्स देताना पाहायला मिळणार आहे.
संग्राम चौगुलेचा गुलिगत सूरजला फुल्ल सपोर्ट
बिग बॉस मराठीच्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यावर काही स्पर्धकांनी धसका घेतला आहे, तर काही स्पर्धकाना याचा काही फरक पडताना दिसत नाही. अशात संग्राम सर्व सदस्यांना गेम समजवताना दिसत आहे. त्यातच संग्राम गुलिगत सूरजलाही गेमचे धडे देताना दिसत आहे. संग्रामचा सूरजला सपोर्ट पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
संग्रामचा सूरजला खास सल्ला
आजच्या भागात सूरज आणि संग्राम गेम प्लॅनबद्दल बोलताना दिसणार आहेत. सूरज म्हणतोय, "सर्वांना गेमप्लॅनमध्ये आपण हादरवून टाकू". त्यावर संग्राम म्हणतो, "आपल्याकडून काही चूक होणार नाही एकढं पाहायचं. बुद्धीसाठी शिकण्याची गरज नसते. दररोजच्या रोज आपण जे करतो त्याच्यातून आपण शिकत असतो".
'अरबाज आणि निक्कीची वाजवायला आलाय संग्राम'
संग्राम चौगुलेची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिलंय, 'अरबाज आणि निक्कीची वाजवायला आलाय संग्राम'. दुसऱ्याने लिहिलंय, 'संग्रामशिवाय कोणातच धमक नाही अरबाज आणि निक्कीशी भिडायची. त्या दोघांना सोडू नको भावा आणि त्या वैभवला तर नाहीच भिडता येत अरबाजशी'. तिसऱ्याने म्हटलंय, 'संग्राम अँड सुरजची जोडी जमायला पाहिजे'. एका युजरने म्हटलंय, 'संग्राम, अरबाज आणि वैभवची भिडंत दाखवा रे लवकर, आम्ही आतुरतेने वाट बघतोय, आत्म्याला शांती मिळू दे'. आणखी एकाने लिहिलंय, 'संग्राम चौगुले, अभिजित सावंत, सुरज चव्हाण टॉप 3 स्पर्धक'.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Telly Masala : अभिनेता सोहेल खानच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाची एन्ट्री ते बिग बॉस 18 मधील स्पर्धकांची यादी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)