एक्स्प्लोर

म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पुष्कर बिकीनीमध्ये फिरतोय

'होऊ दे चर्चा' या साप्ताहिक कार्याअंतर्गत स्पर्धकांना बातम्या निर्माण करायच्या आहेत.

मुंबई : 'बिग बॉस'च्या घरात घडणाऱ्या घटनांवरुन बातम्या होणं काही नवीन नाही. मात्र आता खुद्द बिग बॉसनेच सदस्यांना सनसनाटी बातम्या करण्याचे आदेश दिले आहेत. 'होऊ दे चर्चा' या साप्ताहिक कार्याअंतर्गत स्पर्धकांना बातम्या निर्माण करायच्या आहेत. अभिनेता पुष्कर जोगने स्त्री वेश धारण करुन बिग बॉस मराठीच्या घरात खळबळ उडवून दिली आहे. आपण बिकीनी घातल्यामुळे बातम्या होतील, अशी खात्री पुष्करला आहे. तर दुसरीकडे आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी भांडण उकरुन काढत बातमीदारांना खाद्य पुरवलं आहे. या टास्कमध्ये मेघा धाडे कॅमेरामनच्या तर रेशम टिपणीस पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इतर स्पर्धक कसे बातम्या निर्माण करतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. टास्कदरम्यान स्पर्धकांना आपण किती बातम्या निर्माण केल्या असतील, याची एक ते पाच अशी क्रमवारी लावायची आहे. खरं तर सोमवारच्या भागात दाखवलेल्या प्रोमोमध्ये उषा आणि शर्मिष्ठा एकमेकींशी कचाकचा भांडताना दिसल्या. इतकंच नाही, तर आऊंनी शर्मिष्ठाच्या कानाखाली आवाज काढल्याचंही पाहायला मिळालं. बहुतांश प्रेक्षकांना हे खरोखरचं भांडण आहे की काय, असं वाटलं. आता बिग बॉसच्या घरात काहीतरी चमचमीत पाहायला मिळणार, आऊंनी आपली तलवार अखेर म्यानातून काढली, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटल्या. मात्र सारे काही टास्कसाठी असल्याचे दिसत आहे. म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पुष्कर बिकीनीमध्ये फिरतोय बिग बॉसच्या घरात आता नऊ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू हे नऊ स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सात स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत. काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती. या आठवड्यात रेशम कॅप्टन असल्यामुळे सेफ होती, तर नंदकिशोरला हुकूमशाहच्या टास्कमध्ये दिलेली कामं त्याने पूर्ण केल्यामुळे तोही सुरक्षित झाला. वाळूच्या टास्कमध्ये मेघा आणि पुष्करच्या जोडीने स्वतःला सेफ केल. आस्ताद, सई, उषा, स्मिता आणि शर्मिष्ठा हे पाच स्पर्धक यावेळी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
बिग बॉस मराठी : नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावलं
बिग बॉस मराठी : पुनरागमनावर ऋतुजाची इन्स्टाग्राम पोस्ट
बिग बॉस : आस्ताद, मेघाला हरवत पुष्कर कर्णधार बनला
हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर
बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Embed widget