(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीतून एग्झिट, अरबाज पटेल बिग बॉस सीझन 18 मध्ये झळकणार?
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीचा दावेदार समजला जाणारा अरबाज घरातून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. पण, अरबाज घराबाहेर पडण्यामागचं कारण समोर आलं आहे.
Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi) मध्ये गेल्या आठवड्यात अरबाज पटेल (Arbaz Patel) यानं एग्झिट घेतली. बिग बॉस मराठीच्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अरबाज हा ट्रॉफीचा दावेदार म्हणून ओळखला जात होता. कपटी, बलवान, वेळीच तह करणारा अरबाज एलिमिनेट झाल्यामुळे घरातली त्याची घट्ट मैत्रिण निक्की पूर्ण तुटून गेली. अरबाजच्या जाण्यानं निक्कीला खूप मोठा मानसिक धक्का बसल्याचंही ती वारंवार घरातील सदस्यांना सांगत होती. बिग बॉसनं माझं सम्राज्य हलवल्याचाही उल्लेख निक्कीनं बऱ्याचदा केला. पण, आता अरबाजच्या घराबाहेर पडण्यामागे खूप मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे.
बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीचा दावेदार समजला जाणारा अरबाज घरातून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला होता. पण, अरबाज घराबाहेर पडण्यामागचं कारण समोर आलं आहे. अरबाज पटेल मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आगामी हिंदी बिग बॉसच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना दिसणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अरबाजनं माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळीही अरबाजनं केलेल्या वक्तव्यामुळे अरबाज खरंच बिग बॉस हिंदीमध्ये खेळताना दिसू शकतो, असं बोललं जात आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाज हिंदी बिग बॉस 18 मध्ये जाणार का?, असा प्रश्न विचारताच अरबाजनं सांगितलं की, "बघुया पुढे… महाराष्ट्राला बघायचं असेल तर... पुढे अजून प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला तर मी नक्की कुठे ना कुठे दिसणार आहे." त्यामुळे आता खरंच तो हिंदी बिग बॉस 18 मध्ये दिसणार का? किंवा वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार का? अशा चर्चाना उधाण आलं आहे.
तब्बल 57 दिवस अरबाज पटेल बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये घरात होता. अरबाज म्हणजे, निक्की आणि निक्की म्हणजेच, अरबाज, हे समीकरण अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यावरुन दोघांना झोडलंही. अरबाज आणि निक्कीनं घरातल्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. अरबाजच्या शक्तीपुढे घरातल्यांची पळता भुई थोडी झाली होती. कधी दंगा, वाद, तर कधी भांडणं, क्युट आणि कधी निक्कीसाठी ओक्साबोक्सी रडणारा अशा सर्वच बाजू अरबाजनं प्रेक्षकांना दाखवल्या. काहींनी अरबाजच्या गेमचं कौतुक केलं, तर काहींनी त्याला झोडून काढलं. पण, बिग बॉस मराठीचा प्रवास संपला असला तरी आता लवकरच अरबाज बिग बॉस हिंदीच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.