Bigg Boss Marathi Season 5 : 'गुलिगत' सूरजने चूक दाखवली, निक्कीचा झाला तीळपापड
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरात पाचव्या दिवशी आता निक्की, अरबाज विरुद्ध आर्या असा वाद झाला. तर, दुसरीकडे सुरुवातीपासून बुजरा असणाऱ्या सूरज चव्हाणने निक्की तांबोळीला तिची चूक दाखवून दिली.
Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi New Season Day 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पहिल्या नॉमिनेशन टास्कनंतर आता सगळ्याच स्पर्धकांनी आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात पाचव्या दिवशी आता निक्की, अरबाज विरुद्ध आर्या असा वाद झाला. तर, दुसरीकडे सुरुवातीपासून बुजरा असणाऱ्या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) निक्की तांबोळीला (Nikki Tamboli) तिची चूक दाखवून दिली. सगळ्यांसमोर आक्रमक असणारी निक्कीची पंचाईत झाली. सूरजवर सुरुवातीला डाफरणारी निक्कीचा सूर नंतर मावळला.
बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्कनंतरही वादाचे फटाके फुटत आहेत. नॉमिनेशनच्या वेळी झालेल्या वादावर घरातील सदस्य चर्चा करत असतात. अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीत जोरदार खटके उडाले होते. त्यावर निक्की आणि अंकिता चर्चा करत असतात. त्यावेळी अंकिता निक्कीला सुनावले की ती महाराष्ट्राच्या संस्कृती जपत खेळणार आहे. निक्कीच्या वागण्यावरुन तिला मारलेला हा टोमणा होता. त्यावेळी निक्की तिथून निघून गेली आणि बेडवर जाऊन बसली. ती बेडवर बसल्याचे सूरज पाहतो. निक्की ही बेडवर बसली होती असे सूरज वर्षा यांना सांगतो.
त्यावेळी वर्षा या सूरजला निक्कीसमोर हे सांगशील का, असे विचारतात. त्यावर सूरज त्याला होकार देतो. निक्की किचन एरियात आल्यानंतर बेडवर बसण्याचा विषय निघतो. निक्कीला सूरजने विचारले की ती बेडवर बसली होती ना आणि त्याच्यामुळे आम्हाला भोगावं लागतं. त्यावेळी निक्की आणि सूरजमध्येही वाद होतो. सूरजला सगळ्यांसमोर देण्याचा प्रयत्न करते. निक्की इंग्रजीमध्ये बोलू लागते तेव्हा सूरज तिला समजावतो की, 'निक्की मराठीत बोल, मी मराठी माणूस आहे...'. वर्षा गेल्यानंतर निक्की त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की त्याने असं सर्वांसमोर तिला बोलायला नको होतं. जे काही आहे, तू मला नंतरही असं सांगायला पाहिजे होतं असे निक्की सूरजला सांगते.
View this post on Instagram
इरिनाला हवंय तूप
निखिल आणि डीपीसोबत चर्चा करताना घरात तूप हवंय असे इरिना सांगते. तूप ही अत्यावश्यक नव्हते. त्याऐवजी आपण इतर गोष्टी खरेदी केल्याचे डीपी सांगतो. मात्र, घरात तूप हवंय, त्याचे फायदे काय आहेत हे देखील इरिना त्या दोघांना सांगते.