Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : ''आता मी नसतो कुणाला भीत, मीच हाय गुलिगत टॉपचा किंग''; सूरज चव्हाणनं शड्डू ठोकला
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात बुजरा असणाऱ्या सूरजने आता बिग बॉसच्या ग्रीन सिग्नलनंतर शड्डू ठोकला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा पहिला टास्क पूर्ण झाला. या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांचे गट दिसून आले आहे. तर, दुसरीकडे गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणही (Suraj Chavan) नॉमिनेट झाला आहे. घरात बुजरा असणाऱ्या सूरजने आता बिग बॉसच्या ग्रीन सिग्नलनंतर शड्डू ठोकला आहे.
आपल्या रील्सने लोकांना हसवणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. तर, दुसरीकडे पहिल्याच दिवशी सूरज हा घरात एकटा पडला असल्याचे दिसून आले. घरात वावरताना सूरज हा काहीसा लाजत असल्याचे दिसून आले. नॉमिनेशन टास्कमध्ये ही सूरजला इतरांनी नॉमिनेट केले.
निक्कीने दिला सूरजला इशारा...
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो लाँच झाला आहे. या प्रोमोत निक्की तांबोळी ही सूरजला इशारा देताना दिसत आहे. निक्की म्हणते की, तू मला चॅलेंज करतोय ना, तू इमॅजिनही करू शकत नाहीस की माझं असं रुप पाहू शकशील. निक्कीने सूरजला असा इशारा दिल्यानंतर आता घरात काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लागले आहे.
बिग बॉसने हिंमत वाढवली...
बिग बॉस हे सूरजला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि "सूरज न घाबरता खेळा" अशी सूचना करतात. बिग बॉसच्या या सूचनेनंतर सूरज म्हणताना दिसतोय,"आता मी नसतो कोणाला भीत... कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग", असे म्हणत सूरज जरा वेगळ्याच मूडमध्ये दिसून येतो. बिग बॉसच्या घरात भेदरलेल्या सूरजच्या बॉडी लँग्वेजमध्ये कमालीचा फरक झाल्याचेही दिसून येते.
View this post on Instagram
सूरजला नेटकऱ्यांचा पाठिंबा...
गुलिगत सूरजचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी सूरज पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. 'तू लढ भावा', 'ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गोलीगत बाद', 'आपला भाऊ गोलीगत', 'नड तू', अशा कमेंट्स सूरजच्या पाठिंब्यासाठी येत आहे.
गुलिगत सूरजची नवी स्टाईल नक्की कशी असेल, नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे. सूरजने आक्रमक खेळल्यास बिग बॉसच्या घरात वेगळं चित्र होईल, असे म्हटले जात आहे.