Bigg Boss Marathi Season 5 : 'हेच बघायचं होतं आम्हाला...,' अरबाजकडूनच लागणार वैभववर गद्दारीचा शिक्का, रितेश भाऊ देणार चांगलाच धक्का
Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर रितेश वैभवचा चांगलाच क्लास घेणार आहे. त्यामुळे रितेश आता त्याचा क्लास घेणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : मोत्यांच्या टास्कमध्ये बिग बॉसने (Bigg Boss Marathi New Season) घरात दोन टीम्स पाडल्या होत्या. एका टीममध्ये अरबाज निक्की जान्हवी होते, तर दुसऱ्या टीममध्ये वैभव (Vaibhav Chavan) आणि इरीना होते. पण वैभव त्याचा गेम त्याच्या टीमसाठी खेळला नसल्याचं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होते. आता भाऊच्या धक्क्यावरही (Bhaucha Dhakka) रितेशकडून वैभवची चांगलीच शाळा घेतली जाणार आहे.
या आठवड्यात निक्कीच्या टीममधल्या खेळाडूंनी मोत्यांचा टास्क आणि कॅप्टन्सीचा टास्क या दोन्ही टास्कमध्ये बाजी मारली. पण तरीही वैभवच्या खेळावर प्रेक्षकांची आणि घरातल्यांची चांगलीच नाराजी दिसून आली. त्यावर आता वैभवला रितेश भाऊकडूनही धक्का बसणार आहे.
रितेशने लावला वैभवचा क्लास
या घरात गद्दार कोण आहे, असा प्रश्न रितेश अरबाजला विचारतो. त्यावर अरबाज त्याला वैभव असं उत्तर देतो. त्यानंतर रितेश वैभवला म्हणतो की, तुम्ही जर असं म्हणाला असता की, 'मला तुम्ही तुमच्या टीममधला समजू नका, हे बोलायला ना जिगर लागते. हे बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात नाही मिळत. आम्ही आतमध्ये वैभव पाठवला आहे, गद्दार म्हणून बाहेर येऊ नका.'
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस
भाऊच्या धक्क्याच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, आज वैभवची वाजणारच आहे. दुसऱ्या एका कमेंट करत म्हटलं की, हेच बघायचं होतं आम्हाला आणि त्यांना फक्त बोलू नका तर चांगली शिक्षा पण द्या.
भाऊच्या धक्क्याचा टीआरपी...
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त 'बिग बॉस मराठी' आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.