Bigg Boss Marathi Season 5 : 'बुद्धीही हलकीच, निक्की तुम्ही चावीचं माकड', भाऊच्या धक्क्यावर सलग चौथ्या आठवड्यात निक्कीचा करेक्ट कार्यक्रम
Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर सलग तिसऱ्या आठवड्यामध्ये रितेश देशमुख निक्कीचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं पाहायला मिळालं आहे.
![Bigg Boss Marathi Season 5 : 'बुद्धीही हलकीच, निक्की तुम्ही चावीचं माकड', भाऊच्या धक्क्यावर सलग चौथ्या आठवड्यात निक्कीचा करेक्ट कार्यक्रम Bigg Boss Marathi Season 5 Bhaucha Dhakka Ritiesh Deshmukh slams nikki Tamboli in fourth week also Bigg Boss Marathi new season Bigg Boss Marathi Season 5 : 'बुद्धीही हलकीच, निक्की तुम्ही चावीचं माकड', भाऊच्या धक्क्यावर सलग चौथ्या आठवड्यात निक्कीचा करेक्ट कार्यक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/b713cd0af6095b6885ea214c292f4ba21724502163701720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सलग चौथ्या आठवड्यात स्पर्धकांचे राडे, भांडणं याची शाळा आता भाऊच्या धक्क्यावर घेतली जाणार आहे. जान्हवीने पॅडीला बोलताना केलेल्या शब्दप्रयोगांचाही रितेशने क्लास घेतला. त्याचप्रमाणे आता तो पुन्हा एकदा निक्कीचाही करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं पाहायला मिळतंय.
'बिग बॉस मराठी'च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आलं. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचं एक वेगळचं रूप पाहायला मिळालं. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे.
रितेश निक्कीला सुनावणार खडेबोल
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसणार आहे. रितेश भाऊ म्हणतोय की, "निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हाला या घरातले चावी मारतात...मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका".'बिग बॉस मराठी'चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे.
रितेशने जान्हवीची घेतली शाळा
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,"आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय". त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपुरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : रितेशने दाखवली जागा, बिग बॉसच्या घरातून होणार जान्हवीची हकालपट्टी?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)