(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 5 : जान्हवी अन् वर्षाताई कचाकचा भांडल्या; "माझ्या डोक्यात गेलं, तर मी सोडणार नाही, माझ्या नादी लागू नका"
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवर यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळालं.
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या आठवडा निक्की तांबोळीने गाजवला. या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात निक्की रोज कुणाशी तरी भांडायची, या आठवड्यात जान्हवीने ती जागा चालवली आहे.
जान्हवी अन् वर्षाताईंचं कडाक्याचं भांडण
बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या भागात जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. जान्हवी आणि वर्षा उसगांवकर एकमेकींशी कचाकचा भांडताना दिसल्या. गार्डन एरियामध्ये इतर अनेक सदस्य बसलेले असताना जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्याता वादाची ठिणगी पडवी. यानंतर दोघींपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं, त्यामुळे हा वाद चांगलाच शिगेला पोहोचल्याचं दिसलं.
"माझ्या डोक्यात गेलं, तर मी सोडणार नाही"
छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवीने 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केल्यामुळे बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसत आहे. जान्हवी आणि वर्षा ताईंमध्ये आज जोरदार बाचाबाची झाली. यानंतर जान्हवी वर्षा ताईंना म्हणाली की, "माझ्या डोक्यात गेलं, तर मी सोडणार नाही. ताई, मी पहिल्या दिवसापासून तुमचा मान राखतेय, पण माझ्या नादी लागू नका".
घरात कोणतंच काम करत नाही जान्हवी
जान्हवीने 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याबद्दल तिच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना शॉक बसला होता. घरातील कामांबद्दल 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याआधी ग्रँड प्रीमियरला जान्हवी म्हणालेली, "मला कोणतीच कामं करायला आवडत नाही. मी माझ्या घरीही काम करत नाही. पण आता करावं लागेल. माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे. पण सगळ्यांचं मनोरंजन नक्कीच करेल."
बिग बॉस मराठी'च्या खेळाचा 'असा' आहे जान्हवीचा फंडा
ग्रँड प्रीमियर जान्हवी म्हणाली होती की, "मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही. कारण आपण करतो एक आणि वास्तवात होतं एक. म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन. कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही. घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :