एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : तुम्ही फक्त आरडाओरडा करत बसलात अन् ते नाकाखालून कॅप्टन्सी घेऊन गेले; भाऊच्या धक्क्यावर निक्कीच्या ग्रुपला रितेशचा 'दे धक्का'न

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश सदस्यांची शाळा घेणार आहे. भाऊनं निक्कीच्या ग्रुपला चांगलंच झापलं आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) नवा सीझन चांगलाच चर्चेत आहेत. दुसरा आठवडा सुरु असून रोज बिग बॉसच्या घरात कोणत्या नवीन घडामोडी घडतात, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) पार पाडणार आहे. भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख (Riteish Deshmukh) घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. रितेश भाऊनं आठवड्याभरात झालेल्या राड्यानंतर सदस्यांना त्यांची चूक दाखवत त्यांना झापणार आहे.

रितेश भाऊचा निक्कीच्या ग्रुपला 'दे धक्का'

भाऊचा धक्का पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी फारच उत्सुक आहे. यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख आहे. त्याचा हा नवा अवतार बिग बॉस प्रेमींच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्की तांबोळीला झापलं होतं, त्यानंतर या आठवड्यात रितेश कुणाचा क्लास घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असं असताना भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ निक्की आणि तिच्या ग्रुपला झापताना दिसत आहे.

'...समोरचा ग्रुप कॅप्टन्सी घेऊन गेला'

प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतो की, "अरबाज, वैभव, जान्हवी, घनश्याम आणि निक्की, तुम्हाला हा गेम अजिबात खेळता येत नाही. तुम्हा सगळ्यांना फक्त एकच गोष्ट करता येते दादागिरी, दादागिरी आणि दादागिरी... तुमच्या ग्रुपचा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पराभव पचवता येत नाही, मग तुम्ही वाटेल ते बोलत सुटता. धमकीपासून जी गोष्ट सुरु होते, ती लायकीपर्यंत जाऊन पोहोचते. सतत इतरांना धमक्या द्यायच्या, मी तुला घरातून काढून टाकेन, मी तुझं हे करेन, मी तुझं ते करेन, आम्ही दाखवतो कसा गेम खेळतात ते. तुम्ही फक्त आरडा ओरडा करत बसलात आणि समोरचा ग्रुप तुमच्या नाकाखालून कॅप्टन्सी घेऊन गेला." 

बिग बॉसच्या घरातील ‘दादा’ लोकांची रितेश भाऊंनी घेतली शाळा

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अंकिता बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कॅप्टन

बिग बॉसच्या घरात सध्या दोन ग्रुप पडल्याचं दिसत आहे, यामध्ये निक्कीचा ग्रुप ज्यामध्ये जान्हवी, वैभव, अरबाज आणि घनश्याम हे आहेत, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये अंकिता, आर्या, अभिजीत, सूरज, धनंजय आणि पॅडी आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सीसाठीचं पहिलं कार्य पार पाडलं. ज्यामध्ये निक्की आणि अरबाजच्या नाकाखालून धनंजय आणि योगितासह इतर मंडळींनी चलाखीनं कार्य जिंकलं, ज्यामुळे अंकिता घरातील पहिली कॅप्टन झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : भाऊच्या धक्क्यावर अरबाजचा उतरला माज, सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभवलाही चांगलंच झापलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :   7 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 8 December 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Embed widget