Bigg Boss Marathi : आर्याला बाहेर काढलं ना, आता बिग बॉसवर बहिष्कार; अनफॉलो करा, बघूच नका; सोशल मीडियावर नाराजीचा सूर
Bigg Boss Marathi Season 5 : आर्याला बाहेर काढल्यानंतर बिग बॉसवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
![Bigg Boss Marathi : आर्याला बाहेर काढलं ना, आता बिग बॉसवर बहिष्कार; अनफॉलो करा, बघूच नका; सोशल मीडियावर नाराजीचा सूर Bigg Boss Marathi Fans Angry on show because of Arya Jadhav Elimination Aarya Jadhao marathi news Bigg Boss Marathi : आर्याला बाहेर काढलं ना, आता बिग बॉसवर बहिष्कार; अनफॉलो करा, बघूच नका; सोशल मीडियावर नाराजीचा सूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/1d7d751eb58e42b80ef3d859d10952321726478493397322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi 5 : आर्या जाधवला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढलं आहे. बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेलआणि आर्याने निक्कीच्या थोबाडीत पेटवली. यानंतर बिग बॉस मराठीच्या घरातून आर्याल जाधवला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीवर बहिष्कार टाकण्याची प्रेक्षकांची मागणी
निक्की तांबोळीच्या कानाखाली मारल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. मात्र, त्याच कार्यात अरबाजने अभिजीतवर हिंसेचा प्रयोग करत त्याला धक्का दिला, जान्हवीचा हात पिळवटला, पण त्याला रितेश भाऊंनी हलक्या शब्दात झापलं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. याआधीच्या अनेक टास्कमध्ये निक्कीने इतर सदस्यांना धक्का देत त्यांना खाली पाडल्याचं अनेक वेळा दिसलं आहे, पण तिला काहीही शिक्षा देण्यात आलेली नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर लगावला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर नाराजीचा सूर
आर्याला घराबाहेर काढून बिग बॉसने खूप मोठी चूक केली असल्याचं नेटकऱ्यांनी केली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, "आर्याला घराबाहेर काढून बिग बॉस ने खूप मोठी चूक केली आहे आतापासून आपण सगळ्यांनी बिग बॉस चे इंस्टाग्राम अकाउंट ला अन फॉलो करूया आणि आपण जनतेची ताकद काय आहे ते बिग बॉसला दाखवा." दुसऱ्याने लिहिलंय, आर्या सोबत झालेल्या अन्यायामुळे अनेक जण बिग बॉस पाहणे टाळणार आहे. तिसऱ्याने म्हटलंय, "बॉयकॉट बिग बॉस मराठी". आणखी एकाने विचारलं, "आर्याला घराबाहेर का काढलं? आता आम्ही बिग बॉस पाहणार नाही."
'बॉयकॉट बिग बॉस मराठी'
बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांचा रोष
बिग बॉस मराठीच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. त्यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आलं. यानिर्णयाला नेटकऱ्यांचा विरोध दिसत आहे. तसेच बिग बॉस मराठीला अनफॉलो करत शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : निक्की अरबाजचे चाळे दाखवलेले चालतात, पण आर्याने मारलेलं दाखवू शकतं नाही; बिग बॉसवर प्रेक्षक भडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)