एक्स्प्लोर

पत्नीसोबत मतभेदांच्या चर्चांवर अभिनेता पुष्कर जोग म्हणतो...

पुष्कर जोगची पत्नी जास्मिनने सोशल मीडियावरुन तिचे आणि पुष्करचे सगळे फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे, त्यामुळे आगीत तेलच ओतलं गेलं. त्याचप्रमाणे दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे चर्चांना आणखी ऊत आलं आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी'चा स्पर्धक पुष्कर जोगच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत. पुष्कर आणि त्याची पत्नी जास्मिन ब्रम्हभट्ट यांच्यामध्ये तीव्र मतभेद असल्याच्या अफवांना जोर आला आहे. मात्र यामध्ये काहीच तथ्य नसल्याची प्रतिक्रिया पुष्कर जोगने दिली आहे. पुष्करने 15 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला, मात्र त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये जास्मिन कुठेच न दिसल्यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी'मधील सहस्पर्धक सई लोकूरमुळे पुष्कर-जास्मिनच्या नात्यात वितुष्ट आल्याचं म्हटलं जात आहे. जास्मिनने सोशल मीडियावरुन तिचे आणि पुष्करचे सगळे फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे, त्यामुळे आगीत तेलच ओतलं गेलं. त्याचप्रमाणे दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे चर्चांना आणखी ऊत आलं आहे. पुष्कर आणि सई यांच्यात असलेल्या जवळीकीमुळे जास्मिनसोबत तो वेगळा झाल्याचा दावा काही जणांनी ट्वीटरवर केला आहे. जास्मिनने फादर्स डेला इन्स्टाग्रामवर मुलगी फेलिशासोबत एक फोटो शेअर केला. 'जेव्हा तुम्ही पालक असता- तुम्हाला दोन्ही भूमिका कराव्या लागतात.' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. 'सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणं गरजेचं आहे, असं मला वाटत नाही. मी वर्किंग वुमन आहे. त्यामुळे मी स्वतंत्र आणि खंबीर आहे. म्हणून मी #motherasfather हा हॅशटॅग कॅप्शनमध्ये वापरला' असं उत्तर जास्मिनने 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला दिलं. 'आमच्या नात्याबद्दल पुष्करच नीट सांगू शकेल.' असंही ती म्हणाली.
'आमच्या नात्याविषयी भाष्य करणारे ट्वीट्स हे माझी प्रतिमा डागाळण्यासाठी आहेत. सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहिण्यासाठी ट्रोलर्सना कोण पैसे पुरवतं कोणास ठाऊक. हे सगळं धादांत खोटं आहे' अशी प्रतिक्रिया पुष्करने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली आहे.
View this post on Instagram
 

Cute Post ❤️ Inspiring ! For my bestie 😘 @jogpushkar #marriagegoals #familygoals #bestfriends #hubbylove

A post shared by Jasmine Brahmbhatt (@jasmine_brahmbhatt) on

'माझी बायको, मुलगी आणि आईसोबत माझं नातं कसं आहे, याचं उत्तर कोणालाही देण्यास मी बांधील नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मान राखा आणि माझ्या कुटुंबाला कशातही गोवू नका' असंही पुष्कर पुढे म्हणाला. 'माझ्या कुटुंबाला मीडियापासून दूर राहायचं आहे' असंही पुष्करने सांगितलं. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश केलेल्यांपैकी विजेती मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या मैत्रीची जबरदस्त चर्चा होती. त्यातच सई आणि पुष्कर यांच्याविषयी सोशल मीडियावर अजूनही चर्चा रंगतात. सईड्या आणि पुष्की अशी टोपणनावं त्यांनी एकमेकांना दिल्यामुळे अनेकांच्या भुवया विस्फारल्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Session 6: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
Embed widget