Bigg Boss Marathi 4 : सर्वाधिक लगोरीचे थर कोण रचणार? स्पर्धकांमध्ये पार पडणार कॅप्टीन्सीचे कार्य
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये आज रंगणार महत्वपूर्ण टास्क. सर्वाधिक लगोरीचे थर रचणाऱ्या सदस्याला कॅप्टन बनण्याचा मान मिळणार आहे.
![Bigg Boss Marathi 4 : सर्वाधिक लगोरीचे थर कोण रचणार? स्पर्धकांमध्ये पार पडणार कॅप्टीन्सीचे कार्य Bigg Boss Marathi 4 Who will create the most layers of lagori The captaincy task will be performed among the contestants Bigg Boss Marathi 4 : सर्वाधिक लगोरीचे थर कोण रचणार? स्पर्धकांमध्ये पार पडणार कॅप्टीन्सीचे कार्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/04/cc522520b440fedef3c7ba82243752a21667542062529254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा वादग्रस्त कार्यक्रम मागे पडला आहे. अशातच आज बिग बॉसच्या घरात एक महत्त्वपूर्ण टास्क रंगणार आहे. सर्वाधिक लगोरीचे थर रचणाऱ्या सदस्याला कॅप्टन बनण्याचा मान मिळणार आहे.
कोण होणार कॅप्टन?
सध्या बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील कॅप्टन्सीसाठी लढत होत आहे. घरातील पहिली कॅप्टन समृद्धी जाधव, दुसरी कॅप्टन अपूर्वा नेमळेकर झाली होती. या आठवड्यात अक्षय केळकर कॅप्टन होता. आता येणाऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होईल याची उत्सुकता 'बिग बॉस'च्या चाहत्यांना आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्क मध्ये समृद्धी आणि यशश्रीला कॅप्टनपदाची उमेदवारी मिळाली आहे. आता या दोघींमध्ये कॅप्टीन्सीचे कार्य पार पडणार आहे. यासंदर्भात आजच्या भागात यशश्री आणि तेजस्विनीमध्ये चर्चा रंगणार आहे.
यशश्री तेजस्विनीला म्हणते आहे,"माझी अशी इच्छा आहे तुम्ही दोघींनी माझ्या बाजूने खेळावे. कारण जरी तुम्हांला मी तुमची वाटतं नसले तरीदेखील ही टीम अजूनही माझीच आहे. यावर तेजस्विनी म्हणाली,मला तुझा फक्त एकचं प्रॉब्लेम आहे कि तू पटकन स्नॅप होतेस".
कॅप्टन्सी कार्यात कोणते अडथळे येणार? कोण होणार या कॅप्टन्सी पदाच्या शर्यतीतून बाहेर? हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल... टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)