Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात रंगणार वजनदार कार्य; कोणता सदस्य ठरणार कोणावर भारी?
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात चार चॅलेंजर्स आल्यामुळे शो ची रंगत वाढली आहे.
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) हा रिअॅलिटी शो सध्या कार्यक्रमाची रंगत वाढवताना दिसतोय. कारण घरात चार नवीन चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. या दरम्यान चॅलेंजर्सने घरातील सदस्यांना अनेकदा चुकीची शिक्षा दिली. अनेक मनोरंजक टास्क दिले त्यामुळे शोची गंमत वाढत चालली आहे.
नुकताच बिग बॉसचा प्रोमो समोर आला या दरम्यान महेश मांजरेकर घरातील सदस्यांना एक टास्क देतात. या टास्कमध्ये घरातील कोणता सदस्य वजनदार आहे आणि कोणता खेळाडू या घराला भार आहे. हा टास्क देतात. दरम्यान अमृता धोगडे अपूर्वा नेमळेकरला घराचा भार म्हणून अपूर्वाला देते. यावर अपूर्वा अमृताला टोमणे मारते आणि प्रतिउत्तराला सुरुवात होते.
बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे या दोघींमधला वाद प्रेक्षकांना नवीन नाही. त्याचीच एक झलक प्रेक्षकांना आज पुन्हा बिग बॉसच्या चावडीवर पाहायला मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
कोणत्या सदस्याची होणार एक्झिट?
आज बिग बॉसच्या घरातील एका सदस्याची घरातून एक्झिट होणार आहे. प्रसाद जवादे, अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख आणि रोहित शिंदे हे सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. आता घरामधून कोणता सदस्य घराबाहेर होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
दरम्यान, नुकतंच बिग बॉसच्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट झाली. तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घराबाहेर गेली आहे, तिला निरोप देताना स्पर्धकही खूप भावुक झाले होते. तेजस्विनीला प्रकृतीच्या कारणामुळे बाहेर जावे लागले असले तरी प्रेक्षकांना ती परत येण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :