Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात बर्थ डे डान्स पार्टी रंगणार; चॅलेंजर्स कॅप्टन पदाचे उमेदवार निवडणार
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस बर्थ डे डान्स पार्टीत घरातील चार चॅलेंजर्सवर बिग बॉसने कॅप्टनपदाची उमेदवारी निवडण्याचे कार्य सोपवले आहे.
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) हा विविध कारणांनी चर्चेत आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरातील सदस्य तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) हाताच्या दुखापतीमुळे घर सोडावे लागले. आता या घरात रंगणार आहे बिग बॉस बर्थ डे बॅशची डान्स पार्टी. या पार्टीत घरातील चार चॅलेंजर्सवर बिग बॉसने कॅप्टनपदाची उमेदवारी निवडण्याचे कार्य सोपवले आहे.
बिग बॉस मराठी सीझन 4 च्या घरात आज बिग बॉस बर्थ डे बॅशची डान्स पार्टी रंगणार आहे. या पार्टीत घरातील सदस्य धम्माल आनंद लुटणार आहेत. तसेच, या डान्स पार्टीच्या माध्यमातून घरात आलेल्या चॅलेंजर्सना कॅप्टनपदाच्या उमेदवारीसाठी कोणता सदस्य योग्य आहे त्यांची नावे घोषित करायची आहे. त्यामुळे आजचा भाग काहीसा रंजक पाहायला मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
चाहत्यांना तेजस्विनी घराबाहेर गेल्याचं दु:ख :
बिग बॉसच्या कालच्या एपिसोडमध्ये हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनी लोणारीला बिग बॉसचे घर सोडावे लागले. घरातील सदस्यांबरोबरच चाहत्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता. काही चाहत्यांचा तर विश्वासच बसला नाही. तेजस्विनी लोणारीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तेजस्विनी बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार अशीच चाहत्यांना आशा आहे.
दरम्यान घरातील बिग बॉस बर्थ डे बॅश पार्टीमधून घरातील कोणते सदस्यांची कॅप्टनपदाच्या उमेदवारीसाठी निवड झाली आहे हे पाहणे माज्ञ रंजक ठरणार आहे. कारण मागील दोन आठवडे घरातील एकही कॅप्टन नव्हता त्यामुळे या आठवड्यातील घरातील कॅप्टन कोण होणार याबाबत बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
महत्वाच्या बातम्या :