(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात नवा ट्विस्ट; किरण माने सिक्रेट रूममधून घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणार
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या शोमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत.
Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) शोमध्ये मागच्या आठवड्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत. शो चे होस्ट महेश मांजरेकर यांनी या आठवड्यात घरात डबल एविक्शन होणार म्हटल्यावर शो मध्ये वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. या आठवड्यात यशश्री मसुरकर हिचे एविक्शन झाले. तर, घरातील दुसरा सदस्य कोण एविक्ट होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता होती.
बिग बॉसने दिलेल्या आदेशानुसार घरातील दुसरा सदस्य म्हणजेच किरण माने घराबाहेर निघाले. मात्र, किरण माने जरी घरातून बाहेर गेले असले तरी या खेळातून बाहेर गेले नाहीत. बिग बॉसने गेममध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. तो म्हणजे किरण माने यांना सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी किरण माने यांना घरातील सदस्यांच्या हालचालींवर, त्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवायचे आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
सिक्रेट रूममधून किरण माने ठेवणार घरातील सदस्यांवर लक्ष
बिग बॉसने किरण माने यांना घरातील एका सिक्रेट रूममध्ये बंदिस्त केलं आहे. या ठिकाणी राहून त्यांनी घरातील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे आहे. त्यानुसार, आजच्या भागात विकास सावंत अपूर्वा नेमळेकरशी चेष्टामस्ती करताना दिसणार आहे. त्यावर किरण माने यांना विकासचा खरा चेहरा दिसणार का? अपूर्वामुळे विकास आणि किरण यांच्यातील मैत्रीत दुरावा येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, बिग बॉसच्या येणाऱ्या भागात असेच नवीन ट्विस्ट पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या :
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातून 'टुकटूक राणी'ची एक्झिट; आज कोणाचा प्रवास थांबणार?