Bigg Boss Marathi 4: ‘अर्धवट कपड्यांत नृत्य, मराठी कार्यक्रमात हिंदी गाणी’, ‘मराठी बिग बॉस’च्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज!
Bigg Boss Marathi : प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री अतिशय तोकडे कपडे परिधान करून हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते मात्र चिडले आहेत.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चे चौथे (Bigg Boss Marathi 4) पर्व सुरु व्हायला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे या वादग्रस्त कार्यक्रमाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यंदाच्या पर्वात कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असून, काही नावे देखील चर्चेत आहेत. तर, आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस मराठी सीझन 4’चे प्रोमो आणि टीझर पोस्ट करण्यात आले आहे. यात प्रीमिअरची झलक पाहायला मिळतेय. मात्र, या प्रोमोंवर प्रेक्षक नाराज झाले आहेत.
नुकतेच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’चे दोन प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यात 2 महिला स्पर्धक मंचावर धमाकेदार नृत्य करताना दिसत आहेत. यातून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी, प्रेक्षकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री अतिशय तोकडे कपडे परिधान करून हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते मात्र चिडले आहेत. त्यांनी या प्रोमोवर कमेंट करत मेकर्सना धारेवर धरले आहे.
पाहा प्रोमो :
का संतापले चाहते?
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या शोच्या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री तोकड्या कपड्यांमध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते संतापले असून, त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘मराठी गाणी मिळत नाही का ? हिंदी गाणी का घेतात?’. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हा काय डान्स करतात या अर्धवट कपडे घालून. या पैशासाठी व प्रसिद्धीसाठी काहीपण घालतात व कसा पण विक्षिप्त डान्स करतात. यांना स्टेजवर आणून प्रोत्साहन देणारे मेकर्सही विक्षिप्तच असले पाहिजेत.’
मराठी संस्कृतीला शोभतील असे लोक आणा!
‘जरा मराठी संस्कृतीला शोभतील असे लोक आणा’, असा सल्ला देखील काही चाहत्यांनी दिला आहे. ‘दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी’, असे देखील एकाने म्हटले आहे. तर, ‘असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत tv बघतो. खूप खराब वाटतं..माझा लहान मुलगासुद्धा हे बघतो.. हा डान्स तो हसत होता...मी काहीच बोलू शकले नाही.. त्यातही स्वामी समर्थ सिरीयलच्यामध्ये ही विक्षिप्त जाहिरात आली..कृपया भान ठेवावं’, असं म्हणत एका चाहतीने या प्रोमोवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या