Siddharth Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी 'बिग बॉस'च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया
Siddhartha Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी 'बिग बॉस'च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, अशी अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली आहे.
Siddharth Jadhav On Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या कार्यक्रमामुळे महेश मांजरेकर सध्या चर्चेत आहेत. अशातच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले,"सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडेंना बिग बॉसमध्ये सहभागी झालेलं मला आवडेल".
महेश मांजरेकरांच्या विधानावर सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ म्हणाला,"मी बिग बॉसच्या घरात धिंगाना घालेल असं मांजरेकरांना वाटतं. तर मी सध्या एक धिंगाना घालतोय. मांजरेकरांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा त्यामुळे ते म्हणत असतील तर मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला आवडेल".
हास्यजत्रा फेम शिवाली परब म्हणाली,"महेश मांजरेकरांसारखे दिग्गज 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होण्यासाठी माझं नाव घेतील हे पूर्णपणे आश्चर्यकारक आहे. मी निशब्द आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून मी कधी जाईल असा मी कधीच विचार केला नव्हता".
शिवाली परब पुढे म्हणाली,"यंदाच्या पर्वासाठी मला विचारणा झालेली नाही. पण मला विचारणा झाली तर नक्कीच मला 'बिग बॉस'मध्ये सहभागी व्हायला आवडेल. मुळात मी बिग बॉस प्रेमी नाही. पण मला नविन काहीतरी ट्राय करायला नक्कीच आवडेल. बिग बॉसच्या घरात माझ्यासोबत गौरव मोरे आणि चेतना भट्टसह हास्यजत्रेतलं कोणीही सहभागी झालं तरी मला आवडेल".
महेश मांजरेकर 'बिग बॉस'चा एपिसोड किती वेळा पाहतात?
महेश मांजरेकर म्हणाले,"बिग बॉस'चा जो एपिसोड प्रेक्षक पाहतात तोच मी पाहतो. कारण वेगळं काय पाहून ते बोललो तर प्रेक्षक म्हणील हा वेगळा काय बोलतोय. प्रेक्षक फक्त एक एपिसोड एकदाच पाहतात. मी दोनवेळा पाहतो. दुसऱ्यांदा पाहताना मला कुठे रिअॅक्ट करायचं आहे याची नोंद ठेवतो".
संबंधित बातम्या