Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार वेड्या बहीणींची वेडी माया! स्पर्धक साजरा करणार भाऊबीज सण
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत. आज घरामध्ये भाऊबीज साजरी होणार आहे.
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व सदस्य दिवाळी साजरी करणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत. आज घरामध्ये भाऊबीज साजरी होणार आहे. यशश्री आणि समृद्धी योगेशला भाऊ मानतात त्यामुळे त्यांची भाऊबीज विशेष असणार आहे. बघूया घरामध्ये अजून काय काय घडणार आहे. सदस्यांनी एकत्र मिळून कंदील बनवला आहे तर घराची सजावट देखील केली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉस मराठीच्या सदस्यांनी तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बिग बॉसच्या आगामी एपिसोडची आता चाहते उत्सुकतेने वाट बघत आहे. या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
अमृता फडणवीस यांनी बिग बॉसच्या घरात लावली हजेरी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला घरामध्ये आल्या होत्या समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस. घरामधील स्पर्धक अमृता फडणवीस यांच्या साथीने साजरा करणार दिवाळी सण. बिग बॉस यांनी जाहीर केले, घरात येणार आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस. त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगले पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्न देखील विचारले. यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते.
किरण माने यांनी अमृता यांना प्रश्न विचारला की, 'तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असते, पण मला तुम्हांला विचारायचे आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे?' अमृताजी म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथ राव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: