Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडणार 'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची कार्य; कोण होणार घरातील नवा कॅप्टन?
Bigg Boss Marathi 4 : आज घरात 'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची या कार्यात दोन्ही उमेदवारांना स्पंजने ब्लू टीक पूर्ण भरायची आहे.
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरात 'सोसल तितकंच सोशल' या साप्ताहिक कार्यानंतर आज घरात 'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची हे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. या कार्यात टीम ए मधून विकास सामंत तर टीम बी मधून अमृता धोंगडे हे कॅप्टन्सीच्या शर्यतीत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच सोसल तितकंच सोशल हे साप्ताहिक कार्य पार पडलं. या कार्यात दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. त्यानुसार, टीम ए मधून विकास आणि टीम बी मधून अमृता धोंगडे कॅप्टन्सीच्या शर्यतीत एकमेकांसमोर उभे आहेत. आज घरात 'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची या कार्यात दोन्ही उमेदवारांना स्पंजने ब्लू टीक पूर्ण भरायची आहे. जो सदस्य सर्वात आधी ब्लू टीक पूर्ण भरेल तो सदस्य घरातील नवा कॅप्टन होणार आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
पहिल्यांदा होणार टीम बी चा कॅप्टन
बिग बॉसच्या घरात कॅप्टनपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. आतापर्यंत झालेल्या कार्यात टीम बी कडून उमेदवारी मिळवण्यात आली होती. मात्र, कॅप्टन टीम ए चा झाला होता. दोन्ही टीमपैकी विकास जरी टीम ए मधून खेळत असला तरी तो टीम बी चाच एक सदस्य आहे. आणि त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये टीम बी चाच कॅप्टन होणार अशी चर्चा पाहायला मिळतेय.
कॅप्टन्सीच्या शर्यतीत चुरशीची लढत :
'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची या कार्यात स्पंजने ब्लू टीक भरण्यासाठी अमृता धोंगडे आणि विकासच्या टीमकडून चुरशीची लढत पाहायला मिळतेय. आता या स्पर्धकांपैकी नेमका कोणता उमेदवार कॅप्टन ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :