Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट; मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे 101 उपाय
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा नवा प्रोमो आऊट झाला आहे.
![Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट; मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे 101 उपाय Bigg Boss Marathi 4 Bigg Boss Marathi fourth season promo out Manjrekar said 101 ways to calm anger Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट; मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे 101 उपाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/68eedd8ffd0d6432cb177a56b23b5f391661772498180254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत. मांजरेकर म्हणत आहेत,"यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचं. चिड चिड करायची नाही". मांजरेकर असं म्हणताना हसत आहेत. त्यामुळे मांजरेकर आता चावडीवर स्पर्धकांची शांतपणे शाळा घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
यंदा मांजरेकर घेणार वेगळी शाळा
बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षक बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
'बिग बॉस मराठी' 25 सप्टेंबरपासून होणार सुरू
'बिग बॉस मराठी'चा चौथा सीझन 25 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 24 सप्टेंबरला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडू शकतो. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठीच्या चौथा सीझनला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 'या' दिवशी पासून होणार सुरू; 'सूर नवा ध्यास नवा' अंतिम टप्प्यात
Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)