Bigg Boss Marathi 3 : 'स्वर्ग की नरक' नंतर बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार 'संयमाची ऐशी तैशी' साप्ताहिक कार्य
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात काल 'स्वर्ग की नरक' हा नॉमिनेशन टास्क रंगला होता. त्यानंतर आज 'संयमाची ऐशी तैशी' हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे.
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचे रुपांतर काल अद्भुत नगरामध्ये करण्यात आले होते. या नगराचा राजा म्हणून बिग बॉस यांनी 'संतोष चौधरी' म्हणजेच दादूसची निवड केली. तसेच दादूससाठी स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम या सल्लागारांची नेमणूक करण्यात आली होती. या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया 'स्वर्ग आणि नरक'वर अवलंबून होती. जे सदस्य स्वर्गात ते घराबाहेर जाण्याच्या प्रक्रिये सामील नसतील. तर जे सदस्य नरकात असतील ते नॉमिनेट झाले आहेत. उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा हे सदस्य स्वर्गात होते. तर नरकमध्ये म्हणजेच या आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील नॉमिनेट झाले आहेत. तर बिग बॉसने दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले आहेत. आज घरामध्ये 'संयमाची ऐशी तैशी' हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे.
आज घरात रंगणाऱ्या 'संयमाची ऐशी तैशी' या साप्ताहिक कार्यासाठी घरातील सदस्य दोन टीममध्ये विभागले जाणार आहेत. या टास्कमध्ये घरातील सदस्यांचा संयम तुटेल, तर काही सदस्य संयमाला धरुन चालताना दिसणार आहेत. या टास्क दरम्यान गायत्री आणि विकास तृप्तीताईंना खडेबोल ऐकवणार आहेत. गायत्री आणि विकासच्या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तरं देतील हे आजच्या भागत बघायला मिळणार आहे. 'संयमाची ऐशी तैशी' या टास्कमध्ये नरकातील सदस्य स्वर्गातील सदस्यांना कठीण कठीण टास्क देताना दिसून येणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडला 'स्वर्ग की नरक' हा नॉमिनेशन टास्क. त्यानुसार स्वर्गात कोण जाणार आणि नरकामध्ये कोण जाणार हा निर्णय संपूर्णपणे दादूस यांचा होता. त्यासाठी त्यांना विशाल, स्नेहा आणि गायत्री हे तीन सल्लागार देखील देण्यात आले होते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे घरातील बरीचशी मंडळी दुखावली गेली होती. कालच्या भागामध्ये विशालच्या निर्णयामुळे आणि त्याने मांडलेल्या मुद्द्यांमुळे विकास बराचसा दुखावला गेला. तो ते आज मीनल, सोनाली, आविष्कारसमोर विशालला बोलून दाखवणार आहे. कालच्या भागामध्ये स्नेहाच्या वक्ताव्यामुळे मीराला तिचा खूप राग आला होता. उत्कर्ष आजच्या भागात गायत्री आणि जयसोबत कालच्या टास्कबद्दल सांगताना दिसून येणार आहे.