Bigg Boss Marathi 2 | अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री
चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी मुंबईतून 'मराठी बिग बॉस'च्या सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर बिचुकलेंना खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली.
![Bigg Boss Marathi 2 | अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री Bigg Boss Marathi 2, Abhijeet bichukle re-enter the Bigg Boss house today Bigg Boss Marathi 2 | अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/12191131/Abhijeet-Bichukale-Bigg-Boss-Marathi-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठी बिग बॉसचा स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. अभिजीत बिचुकले आज बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. मात्र रविवारी टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये ते प्रेक्षकांना दिसणार आहेत. अभिजीत बिचुकले सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी मुंबईतून 'मराठी बिग बॉस'च्या सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर बिचुकलेंना खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. बिचुकले हे मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्याने न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
अभिजीत बिचुकले री-एन्ट्री करणारे तिसरे स्पर्धक
बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे तीन स्पर्धक विविध कारणांमुळे घराबाहेर पडले आहेत. त्यातील पराग कान्हेरेची पुन्हा घरात एन्ट्री झाली होती, मात्र त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला. शिवानी सुर्वेचीही पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून ती सध्या बिग बॉसच्या घरात आहे.
कोण आहेत अभिजीत बिचुकले?
साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेंचा जन्म झाला. घरात धार्मिक वातावरण असून ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय आहे. बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होते. पण सुट्ट्यांच्या कारणावरुन त्यांनी सहा वर्षांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन करायला सुरुवात केली.
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.
मराठी बिग बॉसच्या घरात यंदा बिचुकले यांची वर्णी लागली होती. बिचुकले सतत या ना त्या कारणामुळे चर्चेतही राहिले होते. सहस्पर्धक रुपाली भोसले हिला शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्याचप्रमाणे त्यांना कार्यक्रमातून हटवण्याची मागणीही करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)