एक्स्प्लोर

Pune Jain Boarding Land: पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमीनविक्री प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री, मोठं आश्वासन दिलं, नक्की काय घडलं?

Pune Jain Boarding hostel: पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्लेटची जमीनविक्रीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी गटातील नेत्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. याप्रकरणात आता देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले आहे.

Pune Jain Boarding House land: पुणे शहरात मोक्याच्या जागी असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची (Jain Boarding hostel Land) जागा सत्ताधारी गटातील नेत्यांनी संगनमत करुन परस्पर विकल्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वाद पेटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वंचित समाजाच्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये आसरा मिळायचा. मात्र, ही जागा बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आरोप करत जैन समाज (Jain Community) प्रचंड आक्रमक झाला आहे. जैन समाजाकडून शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत या प्रकरणार हस्तक्षेप केला आहे. (Pune News)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जैन बांधवांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी जैन बांधवांना एक निरोपही पाठवला आहे. मी तुमच्या भावना दुखावून देणार नाही. मी या प्रकरणात लक्ष घालेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मात्र, राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत, आम्हाला असली आश्वासनं नकोत, असा पवित्रा घेतला आहे. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू. तोपर्यंत आमचा लढा हा सुरुच राहील. दिवाळीनंतर या जमीनविक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्‍यांनी पुण्याला यावे. आम्ही त्यांचा सत्कार करु, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

Pune News: पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीबाबत रोहित पवारांचा गंभीर आरोप

जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्री प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी गंभीर दोषारोप केले आहेत. पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली आहे. यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्यांचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचे कळते. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशांसाठी जैन मंदिरही गिळंकृत केलं. सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईसिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यात सोबत आहोत. सरकारनेही यात हस्तक्षेप करुन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरु, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

आणखी वाचा

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीवरुन वाद, जैन बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Ajit Pawar: निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
Rohit Pawar: पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mundhwa Land Scam: येवलेंनी बॉटीनिकल सर्वे ऑफ इंडियाला लिहिलेली पत्रं 'माझा'च्या हाती
Anandache Paan : Dashakatale Lekhak पुस्तकाच्या लेखिका आणि Gada पुस्तकाचे लेखक यांच्याशी खास संवाद
Matoshree Drone Rowमातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या,पॉडटॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणुकीनंतर भाजप शिंदेना टार्गेट करणार', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Parth Pawar Land Deal: '...तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या', रोहित पवारांचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Ajit Pawar: निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
Rohit Pawar: पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
Political News: निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदवार जाहीर, चिपळूणमध्ये युती अन् आघाडीमध्ये रस्सीखेच
निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदवार जाहीर, चिपळूणमध्ये युती अन् आघाडीमध्ये रस्सीखेच
Nashik Elections 2025: शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
Embed widget