Poisonous Fish Death: विषारी मासा बोटीत शिरला, तरुणाच्या पोटावर चावा घेतला, आतड्याला दुखापत, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुनही जीव वाचलाच नाही
Poisonous Fish Death: कारवार येथे समुद्रात मासेमारी करत असताना एका माशाने चावा घेतल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Poisonous Fish Death: कारवार (Karwar) येथे समुद्रात (Sea) मासेमारी (Fishing) करत असताना एका विषारी माशाच्या (Fish) चाव्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्मीळ व दु:खद घटना घडली आहे. मृत युवकाची ओळख अक्षय अनिल माजाळीकर (वय 24, रा. दांडेबाग, ता. कारवार) अशी असून, तो मच्छीमारी व्यवसायाशी संबंधित होता.
ही घटना अरबी समुद्रात मासेमारीदरम्यान घडली. अक्षय आपल्या सहकाऱ्यांसह मासेमारी करत असताना अचानक "आक्षेन टोळी" (स्थानिक नाव) या जातीच्या सुमारे 8 ते 10 इंच लांबीच्या माशाने होडीत उडी मारून त्याच्या पोटावर चावा घेतला. या माशाच्या शरीरावर अत्यंत टोकदार काटे असतात, जे जिवघेणी इजा करू शकतात. चाव्यामुळे अक्षयच्या आतड्याला गंभीर दुखापत झाली.
Poisonous Fish Death: उपचारादरम्यान प्राण सोडले
त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने कारवार येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीस सांगितले. मात्र, त्याच्या वेदना वाढत राहिल्या आणि तब्येत अधिकच बिघडली. नंतर एक्स-रे चाचणीनंतर पोटावर सर्जिकल टाके (stitches) घालण्यात आले, पण त्याची स्थिती सुधारली नाही. शेवटी उपचारादरम्यानच त्याने प्राण सोडले.
Poisonous Fish Death: ग्रामस्थांची जोरदार निदर्शने
या घटनेनंतर कारवार आणि परिसरातील मच्छीमारी समाजात मोठी खळबळ उडाली आहे. युवकाच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत, शेकडो ग्रामस्थांनी वैद्यकीय महाविद्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. रुग्णावर वेळेवर आणि प्रभावी उपचार न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Poisonous Fish Death: दुर्मीळ मृत्यू; कर्नाटकातील पहिलीच घटना
माशाच्या चाव्याने मृत्यू होण्याची ही कर्नाटकातील पहिलीच नोंदवलेली घटना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जगभरात 1978 पासून आतापर्यंत अशा प्रकारे फक्त 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















