एक्स्प्लोर

Tejas MK1A: शत्रूची आता खैर नाही! नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस एमके 1A लढाऊ विमान; HAL ची ऐतिहासिक कामगिरी

Tejas MK1A: देशात बनवलेलं पहिलं तेजस एमके 1A लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथून आज आकाशात झेपावलं.

Tejas MK1A: ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी ऐतिहासिक घटना आज नाशिककरांनी अनुभवली. देशात बनवलेलं पहिले तेजस एमके 1A (Tejas MK1A ) लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या ओझर युनिटमधून आज आकाशात झेपावलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक कामगिरी पार पडली.

हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल झालं असून, त्यासोबतच HAL च्या नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. बंगळुरूनंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण घडी ठरली आहे.

Tejas MK1A: HAL च्या धावपट्टीवरून ऐतिहासिक झेप

HAL च्या नाशिक युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेजस एमके 1A विमानाने आज पहिली झेप घेतली. विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फवार्‍यांनी त्याचे जलतुषारात स्वागत करण्यात आले. यानंतर चित्तथरारक एअर शो सादर करण्यात आला, ज्यामध्ये तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.

Tejas MK1A: तेजस एमके 1A लढाऊ विमानाची वैशिष्ट्य

पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान सर्वात हलके लढाऊ विमान आहे. ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास हे विमान सक्षम आहे. 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले हे लढाऊ विमान आहे. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य होते. CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य होते. SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा आहे. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते. EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते. SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती मिळते. डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता आहे. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण मिळवते.

Rajnath Singh: काय म्हणाले राजनाथ सिंह? 

यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, लढाऊ विमानाची शानदार उड्डाणे झाली. गौरव, अभिमान वाटत होता. ज्यावेळी हा कार्यक्रम संपन्न होत होता, तेव्हा श्रीरामाचे भजन होत होते. श्रेया जोशी या गायिकेने गायले त्यांचे अभिनंदन. या निमित्ताने नाशिकला येण्याचा योग आला. नाशिकची भूमी ऐतिहासिक आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाची भूमी आहे. इथे आल्यावर दिव्य भूमीत आल्यासारखे वाटते. इथे आस्था, श्रद्धा आहे. त्याच वेळी एचएएल हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती गौरवाने फुलून गेली. हे आत्मनिर्भर भारताचे पाऊल आहे. आजवर इतर देशांवर आपला देश अवलंबून होता. आता भारतात 65 टक्के विमान बनत आहोत. थोड्याच दिवसात आपण 100 टक्के आत्मनिर्भर होणार आहोत, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Poisonous Fish Death: विषारी मासा बोटीत शिरला, तरुणाच्या पोटावर चावा घेतला, आतड्याला दुखापत, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुनही जीव वाचलाच नाही

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget