Yed Lagla Premach : 'बिग बॉस'फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री! झळकणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
Yed Lagla Premach : 'बिग बॉस मराठी'फेम (Bigg Boss Marathi) लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premach) या मालिकेत झळकणार आहे. मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे.
Yed Lagla Premach : छोट्या पडड्यावर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका (Marathi Serials) प्रदर्शित होत आहेत. या मालिका चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. नव्या मालिकांचं कथानक, कलाकार अशा सर्वच गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi), कलर्स मराठीवरील (Colors Marathi) मालिका प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी देत आहेत. 'बिग बॉस मराठी'फेम (Bigg Boss Marathi) लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premach) या मालिकेत झळकणार आहे. मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे.
स्टार प्रवाहवर 27 मे 2024 पासून रात्री 10 वाजता सुरू होणाऱ्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांना आपण भेटलोय. लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे.
जय दुधाणे दिसणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत!
जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, 'मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय.
View this post on Instagram
जय पुढे म्हणाला,"विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे".
येड लागलं प्रेमाचं
कधी सुरू होणार? 27 मे
कुठे पाहाला? स्टार प्रवास
किती वाजता? रात्री 10 वाजता
संबंधित बातम्या