Bigg Boss 18 : अविनाश मिश्रानंतर विवियन डिसेनासोबत भिडली चाहत पांडे, दोन सदस्यांवर एलिमिनेशनची तलवार
Vivian Dsena vs Chahat Pandey : अविनाश मिश्रानंतर चाहत पांडे विवियन डिसेनासोबत वाद घालताना दिसली.
Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉसचं घर म्हटल्यावर राडा तर होणारचं. त्यामुळे या शोकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. असं असताना घरात दररोज नवनवीन सीन पाहायला मिळत आहेत. बिग बॉस 18 मध्ये अविनाश मिश्रा याचा रोज कोणत्या ना कोणत्या सदस्यांसोबत वाद होताना दिसत आहेत. त्यातच आविनाश मिश्रा आणि चाहत पांडे यांच्यात भांडण झाल्याचं दिसून आलं. अविनाशसोबत बाचाबाचीनंतर आता चाहत पांडे विवियन डिसेनाला भिडताना दिसणार आहे. चाहत पांडे आणि विवियन डिसेना यांच्या भांडण पाहायला मिळणार आहे.
विवियन आणि चाहतमध्ये जोरदार बाचाबाची
बिग बॉसच्या घरात चाहत पांडेचं अविनाश मिश्रासोबत कडाक्याचं भांडण झालं. यानंतर अविनाश मिश्रा झोपला असताना चाहत पांडेने त्याच्यावर पाणी फेकलं. या मुद्द्यावरुन सकाळपासून दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत गोंधळ सुरू होता. दोघांमध्ये खूप जोरदार भांडण झालं. पण शुक्रवारी चाहत पांडेचं घरातील दुसरा सदस्य विवियन डिसेनाशीही वाद झाला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
विवियनच्या ब्लँकेटला लागली हळद
चाहत पांडेने हळद वापरली होती. त्यानंतर तिच्या हाताला हळद राहिली. नंतर ही हळद व्हिव्हियन डिसेनाच्या ब्लँकेटला लागली. शुक्रवारी शोचा प्रीमियर सुरू झाला तेव्हा सकाळपासून विवियन चाहतवर भडकल्याचं पाहायला मिळालं. दोघांनीही एकमेकांवर आवाज वाढवला, यानंतर जोरदार बाचाबाची झाली. मात्र, विवियनने हे प्रकरण शांतपणे हाताळत वातावरण शांत केलं. विवियनच्या सामंजस्यामुळे भांडण टळलं. दोन दिवसात चाहत पांडेशी भांडणारा विवियन डिसेना आता दुसरा सदस्य आहे. याआधी चाहतचे शोचे स्पर्धक अविनाश मिश्रासोबत भांडण झाले होते.
'या' सदस्यांवरही नॉमिनेशनची टांगती तलवार
बिग बॉस 18 शोमध्ये काही सदस्य रोज काही ना काही करत टीव्हीवर दिसत आहेत. मात्र, काही स्पर्धक आहेत, जे पूर्णपणे लपले गेले आहेत. यामुळे अशा सदस्यांवर आता घराबाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. शोमध्ये सहभाग नसल्याने मुस्कान आणि ताजिंदर सिंग बग्गा या दोन स्पर्धकांवरही नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.
पाहा व्हिडीओ : विवियन डिसेना आणि चाहत पांडे यांच्यात बाचाबाची
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :