Bigg Boss 18 : चाहतबद्दल अविनाशचं अश्लील वक्तव्य, सिद्धार्थ शुक्लाचा VIDEO व्हायरल करत नेटकऱ्यांनी सदस्यांवर व्यक्त केला संताप
Netizens Angry on Bigg Boss 18 : बिग बॉस 18 च्या घरात अविनाश मिश्राने चाहत पांडेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
Avinash Mishra Disrespected Chahat Pandey : बिग बॉस 18 चा तिसरा आठवडा सुरु आहे. सध्या अविनाश मिश्रा खलनायकाच्या रुपात समोर येत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एन्ट्री करत अविनाश मिश्राने घरातील इतर सदस्यांच्या डोक्यावर चढत तांडव करायला सुरुवात केली. अविनाश मिश्रा दररोज घरातील सदस्यांशी पंगा घेताना आणि वाद घालताना दिसत आहे. यावेळी मात्र अविनाश मिश्राने हद्दच केली, ज्यावर प्रेक्षकही चांगले संतापल्याचं दिसत आहे. अविनाश मिश्राने चाहत पांडेबाबत अश्लील वक्तव्य केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका महिलेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, नॅशनल टेलिव्हिजनवर हे कसं काय दाखवलं जातं? असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
चाहतच्या चारित्र्यावर अविनाशचं आक्षेपार्ह वक्तव्य
'बिग बॉस 18' मध्ये राशनच्या मुद्द्यावरून वादावादी झाली. अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे यांच्यात जोरदार वाद झाला. अविनाश मिश्रा झोपेत असताना चाहत पांडेने त्याच्यावर पाणी फेकलं, यामुळे अविनाश संतप्त झाला आणि रागाच्या भरात त्याने चाहतचा अपमान केला. यानंतर अविनाश मिश्राला सोशल मीडियावर अविनाश मिश्रावर निशाणा साधत त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घरातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्याने चाहत पांडेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केलेने त्याला नेटकऱ्यांचा जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे.
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
गेल्या एपिसोडमध्ये चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा यांच्याच जोरदार राडा पाहायला मिळाला. चाहत पांडेने झोपलेल्या अविनाश मिश्रावर सकाळी 5 वाजता पाणी फेकलं, यामुळे भडकलेल्या अविनाशने अख्खं घर डोक्यावर घेतलं. तो चाहतला 'गवार' आणि 'गधी' बोलला. तो इतक्यावरच थांबला नाहीतर रागाच्या भरात चाहतला सुनावताना त्याची जीभ घसरली आणि त्याने तिच्यावर अभद्र टीका केली. यानंतर अविनाशवर नेटकरी भडकले आहेत. याशिवाय घरातील इतर कोणत्याही सदस्याने यावर भूमिका न घेतल्याने नेटकऱ्यांनी सदस्यांवर संताप व्यक्त केला आहे.
अविनाश मिश्राचं चाहत पांडेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
भांडणादरम्यान, अविनाश मिश्रा चाहत पांडेला म्हणाला, "मला माहित आहे, चाहतच्या मनात कुठेतरी माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे माझ्यावर पाणी फेकते. जेणेकरून तिला माझे ओले केस दिसतील. माझे ओले शरीर पाहता येईल". यावेळी एलिस, ईशा हसत होते आणि घरातील इतर सदस्य शांतपणे बघत होते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा
This house is full of cowards and spineless people. Avinash just assassinated a girl's character on national television, yet no one had the courage to stand up and speak out in that moment.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 23, 2024
Even Karan Veer Mehra, who gaslighted Chahat Pandey to go and fight, then mocked her…
pic.twitter.com/QVMHoAax9J
— SatyavadiLadki (@SatyavadiLadki) October 24, 2024
Her reaction says it all,@ChahatPofficial
I mean who likes all this on a national television man?
Chahat Pandey rocked Avinash Mishra shocked 👎
Chahat is prettiest & strongest girl of the show, she’s not a follower she takes her own stand also she’s…
A woman should not be treated this way. I was shocked to see that no one came in front to protect her.
— Alex (@Raghu_Xt) October 23, 2024
बिग बॉस 13 चा व्हिडीओ शेअर करत सदस्यांना झापलं
नेटकऱ्यांनी बिग बॉस सीझन 13 मधील सिद्धार्थ शुक्लाचा व्हिडीओ शेअर करत बिग बॉस 18 मधील सदस्यांना झापलं आहे. बिग बॉस 13 मध्ये टास्कदरम्यान एका महिला सदस्याचा अपमान झाल्यानंतर सिद्धार्थने त्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. सिद्धार्थ शुक्लाच पुढे बिग बॉस 13 चा विजेता झाला.
सिद्धार्थ शुक्लाचा व्हिडीओ व्हायरल
I still remember when dey character assainated arti & shehnaaz how #SidharthShukla took stand for them this is how man should be raised, But yesterday when nash CA #ChahatPandey not a single men took stand for her they all were laughing on her, Highly disappointed..👎#BiggBoss18 pic.twitter.com/GHlwOtFGin
— Don't Look 💅 (@ChalNikalBeyyy) October 24, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :